प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

27

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.10ऑगस्ट):-स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांचे निवेदन ‌१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या आधी बाजारात तिरंगा मास्क उपलब्ध आहेत. नांदेड जिल्ह्यातही तिरंगा रंगाचा प्लास्टिक ध्वज व मास्क विक्रीस येऊ शकतात, या खरेदी विक्रीवर ताबडतोब जिल्हाधिकारी साहेबांनी बंदी घालून संबंधितांना आदेश देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवानंद पांचाळ यांनी नायगांव तहसिलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिवानंद पांचाळ आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की , यावर्षी भारत देश २०२१ मध्ये आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. बाजारामध्ये तिरंगा मास्क प्लास्टिक झंडे विक्रीसाठी आले आहेत हा मास्क नव्हे स्वाभिमानी भारताचा तिरंगा आहे, तो भारतियांचा अभिमान आहे, या राष्ट्रीय स्वाभिमाला ठेच पोहचवण्याचे काम जर कोणी हे केले तर कठोर कारवाई करण्यात येईल तिरंगा मास्क प्लास्टिक झेंडे विक्री केली अथवा खरेदी केली असे निदर्शनास आल्यास हे खपवून घेतले जाणार नाही तिरंगा म्हणजे देशाची व महाराष्ट्राची आन बान शान आहे भारतीय तिरग्यांसाठी आज सीमेवर जवान आपला प्राण देतोय आणि तिरग्यांचे मास्क बनवून मनोविकृतीचे लोक विकत आहे.

हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. सुजाण नागरिकांनी मास्क खरेदी विक्री करू नये आणि तो घालू नये तिरग्यांचा अवमान करू नये तिरंगा मास्क प्लास्टिक झेंडे नांदेड जिल्ह्यातही विक्रीवर ताबडतोब नांदेड जिल्हा प्रशासनाने बंदी घालावी राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे आपल्या सर्वांचे अंतिम कर्तव्य आहे. असे‌ स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले,