सफाई कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याची मागणी

26

🔹अन्यथा 13 ऑगस्ट रोजी अमरण उपोषण करण्याचा कामगारांचा इशारा…

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.10ऑगस्ट):- तालुक्यातील
कुंडलवाडी येथील नगरपालिका सफाई कामगार,घंटागाडी कामगार व इतर कामगार यांना घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराच्या अभावामुळे गेल्या सहा महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाने संबंधित सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, संबंधित सफाई कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे असे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड,मुख्याधिकारी कुंडलवाडी यांना नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने देण्यात आले……

सदरील निवेदनात असे नमूद केले आहे की, कुंडलवाडी नगरपरिषद मध्ये मागील सात वर्षांपासून सफाई कामगार,घंटागाडी कामगार व इतर कामगार म्हणून कामगार कार्यरत आहेत,सदरील शहराची लोकसंख्या पाहता किमान 50 कामगारांची आवश्यकता आहे,पण घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांच्या अभावामुळे जवळपास 34 कामगारांना नगरपालिका प्रशासनाने कामावरून काढून टाकले,शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिले असता या कामगारांचे काम अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे सी आय टी यु (CITU )संलग्न असलेल्या कामगार संघटनेच्या सभासद कामगारांना दिनांक 13 ऑगस्ट पूर्वी नगरपालिका प्रशासनाने कामावर रुजू करून घ्यावे.

अन्यथा दिनांक 13 रोजी सकाळी 11:30 वाजता नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण व बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहायक कामगार आयुक्त नांदेड,मुख्याधिकारी कुंडलवाडी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला…

सदरील निवेदनावर नांदेड जिल्हा मजदूर युनियन अध्यक्ष गंगाधर गायकवाड,तोटावार पेंटाजी,मारोती हातोडे,नवज्योत कपाळे,संजय साळुंके,नागेश श्रीरामे,साईप्रसाद येपुरवार,दिलीप वाघमारे,रमेश कांबळे, रामा हातोडे,सुमीत वाघमारे,मोहन गाजरे,चांदराव वाघमारे,गंगाधर कांबळे,गंगाराम कंपाले,देविदास गांजरे,साईनाथ गाडेकर,दर्शन गांजरे,शीतल वाघमारे,वामन वाघमारे,जनाबाई वाघमारे,रमाबाई गांजरे,सखुबाई गांजरे,चंद्राबाई वाघमारे,होसाबाई वाघमारे,ध्रुपतबाई येलमे,ध्रुपतबाई वाघमारे आदीसह अनेक कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत….