स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन साजरा

22

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.16अगस्ट):- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिवस उमरखेड शहरात मोठया उत्साहाच्या वातवरणात साजरा करण्यात आला.तहसिल कार्यालयाच्या पटांगणात आयोजित मुख्य कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राठोड यांनी ध्वजारोहण केले .

यावेळी पोलीस निरीक्षक आनंद वागुळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाने उपविभागीय अधिकारी यांना मानवंदना दिली.
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय सोहळ्याला आमदार नामदेव ससाने, तहसीलदार आनंद देऊळगावकर, पं .स. सभापती प्रज्ञानंद खडसे , न. प . मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले , गटविकास अधिकारी प्रविण वानखडे , नायब तहसिलदार के. बी . डांगे, व्हि . व्हि . पवार, एस. डी . पाईकराव,स्वातंत्र्यसंग्राम सैनिक , न.प. सदस्य , पं.स. सदस्य , प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार , तलाठी , तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विर पत्नी सत्वशीला काळे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला . तसेच महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचार्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले . आणी जिव्हाळा संस्थेच्या वतीने कोरोणा काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाज सेवकांना कोरोणा योद्धा प्रमाणपत्र देवन सन्मान करण्यात आला . ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यापुर्वी शहरात नगर परिषद , गांधी चौक , पंचायत समीती , पोलीस स्टेशन , सा . बा . उपविभाग , एस .टी. डेपो , उपमाहिती कार्यालय , उपकोषागार , तसेच इतर शासकीय , निमशासकीय , महामंडळाचे कार्यालये , विविध बँका , शाळा , विद्यालय , महाविद्यालय , येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरे करण्यात आले.