कब्रस्थान परिसरात स्वातंत्र्य दिनाचे पर्वावर वृक्षारोपण

20

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.16ऑगस्टमध्ये):-स्थानिक निशाणपुरा वार्ड येथील कब्रस्थान परिसरात स्वातंत्र्य दिनाचे पर्वावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी निशाणपुरा कब्रस्थान येथे वृक्षारोपण करण्यात आले, आंबा,चिक्कु ,जाम्भूळ,आवळा इत्यादि पर्यावरणपूरक तसेच लोकोपयोगी ५० झाडांची लागवड करण्यात आली.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिस्मिल्लाहखान होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका वैशाली ताई सुरकार , नगरसेवक धनंजय बकाने , नगरसेवक प्यारूभाई , अॅड. इब्राहिम बख्श आझाद, हाजी मोहम्मद रफीक, प्रविन उपासे, इम्रान सर, इकबाल पहेलवान , अमीन भाई, रहीम पहेलवान , अब्दुल सलीम , सलीम कुरेशी , गुडु मौलाना . आसिफ सोलंकी निशानपुरा मस्जिद अध्यक्ष मुस्ताक अहेमद,मस्जिद सेक्रेटरी करीमखान ,अताउलाखान ,यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली .

कार्यक्रमाचे आयोजनासाठी निशाणपुरा कमेटी अध्यक्ष अहेमद खान, उपाध्यक्ष अंनिस खान , सचिव शेख इर्शाद, सहसचिव शेख नदीम, कोषाध्यक्ष शेख सोहेल सदस्य कलाम खान सदस्य ईस्माइल खान इत्यादिनी परिश्रम घेतले.