उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणुन सत्कार…

21

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.16ऑगस्ट):-कुंडलवाडी येथुन जवळच असलेल्या मौजे मोकळी( थडी) चे भुमिपूत्र उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांचा मुंबई उपनगर जिल्हा येथे महसुल उत्कृष्ट विभाग २०२०-२०२१ मध्ये प्रशासना अंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील मौजे मोकळी (थडी) येथील एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या संभाजी अडकुणे यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

कोरोणासारख्या संकट काळात मुंबई विमानतळावर अधिकारी म्हणुन केलेले कार्य अतिशय उत्तम होते.मुंबई उपनगरात लॉकडाउन काळात अडकलेल्या अनेक मजूरांची त्यांनी केलेली सोय उल्लेखनीय आहे.

मित्तभाषी असलेले अडकुणे कुणाच्याही संंकटात धाऊन जातात.नायगाव तालुक्याचे पहिले तहसीलदार म्हणुन केलेले कार्य आजही गौरव केले जाते. त्यांच्य या यशस्वी कार्याबद्दल शिवकांत पाटील वारले(मा.सरपंच) बळेश्वर शिवदास अडकुणे( पोलीस पाटील) हणमंत ईरवंतराव वारले( ग्रा.पं.स.) हणमंतराव मारोती वारले( ग्रा.पं.स.) रमेश शिरगीरे( उपसरपंच)साईनाथ हणमंतराव वारले( व्यापारी) शंकरराव पाटील हुंडेकर,व्यंकट पेंडकर,अशोक हाके,शंकर पाटील शिवशेट्टे,विजय गुप्ता आदींनी अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या..