वनातील रानभाजी मानवी आरोग्यासाठी गुणकारी.पालकमंत्री मा. ना. संदिपान भुमरे

26

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.17ऑगस्ट):-पावसाळ्यात वनात उगवणाऱ्या रानभाज्या मानवी आरोग्यासाठी गुणकारी ठरत असल्याने त्याचे सेवन करावे असे मत मा.ना.श्री संदिपान भुमरे मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांनी व्यक्त केले .जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ व प्रकल्प संचालक आत्मा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

शासनाने रानभाजी चे महत्व ओळखून रानभाजी महोत्सव राज्यभरात सुरू केला आहे. कोणत्याही रासायनिक खताचा वापर नकरता नैसर्गिक रित्या आठळुन येणाऱ्या या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून या भाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे .सध्या स्थितीत कोरोणाच्या संकटाचा आपण सामना करीत आहो.या संकटाचा तसेच आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणे गरजेचे असल्यामुळे नागरिकांनी दैनंदिन आहारात त्याचा समावेश करावा, असे आव्हान जिल्ह्याचे पालक मंत्री संदीपानजी भुमरे यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरामध्ये रानभाजी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ ,नगराध्यक्षा कांचन चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.के. धरणे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यवतमाळ, कृषी उपसंचालक व तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. माजी आमदार विजयराव खडसे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.
पालक मंत्री संदीपानजी भुमरे यांनी सर्वप्रथम रानभाजी महोत्सवातील स्टॉलला भेट देत पाहणी केली. पालकमंत्री म्हणाले की कोरोनासारखी संसर्गजन्य महामारी देशात पसरली आहे. या काळात ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होती ती व्यक्ती जगली. रानभाज्या मध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. विविध रानभाज्या या महोत्सवात पहायला मिळाल्या. त्यापेक्षा अधिक भाज्याची ओळख ही या ठिकाणी झाली. या रानभाज्या मध्ये लोह व प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात आढवळून येते .या रानभाज्या चा प्रचार- प्रसार करणे फार महत्त्वाचे आहे .

या रानभाज्या वर्षभरातून फक्त दोन महिन्यातच उपलब्ध होतात. त्यामुळे येणाऱ्या पिढीला जे मिळत नाही ते मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणून या महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाने हा महोत्सव राबवण्याचे ठरवले .त्यामुळे शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना स्टॉल लावता आले .यातून शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळेल व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत देखील मिळणार आहे.या महोत्सवातील रानभाज्या काय आहे.याची शहरी भागातील नागरिकांना माहिती मिळत आहे .या रानभाज्याचा चांगला वापर आहारात झाल्यास नागरिकांना चांगल्या आरोग्य मिळेल .व रानभाज्या च्या माध्यमातून रोजगार देखील प्राप्त होईल .असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.

या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा व तालुकास्तरावर शेतकरी व बचत गटांना फायदा झाला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळकर यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाज्यांचे महत्त्व या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले .उमरखेड ते झरी जामणी या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात डोंगरदऱ्यातून मोठ्या कष्टाने आदिवासी बांधव शेतकरी ,महिला बचत गट ,कृषि मित्र यांनी मोठ्या कष्टाने निवडून या रानभाज्या उपलब्ध करून आपले स्टॉल या ठिकाणी लावले. आणि त्यामुळे सहभागी झालेल्या शेतकरी, कृषी मित्र ,बचत गट जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व याठिकाणी आकाशवाणी यवतमाळ च्या किसान वाणी शेतकऱ्यांसाठी असलेल्या किसान वाणी या कार्यक्रमाच्या निवेदिका मृणालिनी दहीकर ,शिवानी वानखडे, कांबळे मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी त्या ठिकाणी मुलाखत सुद्धा घेतल्या. उमरखेड तालुक्यातून तालुका कृषी अधिकारी एस.एस निंबाळकर .

आत्माचे रत्नदीप धुळे, कृषी मित्र विकास मुटकुळे वरुड बिबी, काशिनाथ डाखोरे ,संजय राठोड कृषी मित्र पिंपळगाव, राहुल कांबळे कृषी मित्र लिंगी ,अमोल मिराशे कृषी मित्र बाळदी ,वैभव कदम कृषी मित्र मरसुळ ,कोमल शिंग आडे कृषी मित्र आमनापूर ,गणेश वामन शिंदे कृषी मित्र नागेशवाडी, अमोल उत्तम जोगदंड कृषी मित्र धनच त्यांनी सहभागी होऊन आपले स्टॉल या ठिकाणी लावले होते. यावेळी आकाशवाणी यवतमाळ साठी अमोल उत्तम जोगदंडे कृषी मित्र धनज. विकास मुटकुळे व काशिनाथ डाखोरे यांची संयुक्तरीत्या मुलाखत सुद्धा या ठिकाणी घेतली.