श्री व्यायाम प्रसारक मंडळातर्फे मरीमाता मंदिर परिसरात वृक्षारोपण

33

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.17ऑगस्ट):- – धरणगांव येथील श्री व्यायाम प्रसारक मंडळातर्फे मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्याची दंगल व सामाजिक उपक्रम राबवित असते तसेच आज श्रावण महिन्यातील दुसरा मंगळवारी मरीमातेची पूजा आरती आटोपल्यानंतर मरीमता मंदिर परिसरात वृक्षरोपण मंडळाचे ज्येष्ठ संचालक गुलाबरावजी वाघ, सुरेश नाना चौधरी, जीवन आप्पा बयस, देवा बापू महाजन, विलास नाना येवले, राजेंद्र आ पवार, प्रकाश पाटील, भास्कर मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, सचिव प्रशांत वाणी, संचालक नारायण महाजन, किरण वाणी, किशोर पैलवान, गोपाल पाटील, मरीमाता संस्थाचे उपाध्यक्ष रमेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते गोविंद सिंग राजपूत, संजय चौधरी, मंदिराचे पुजारी सुभाष पुरोहित उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान महाजन विजय महाजन दीपक सोनवणे हरी महाजन पैलवान यांनी सहकार्य केले.