धानोरा, डिग्रस, जळगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे कोवीड शिल लशीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी ग्रामस्थांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद

34

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

गेवराई(दि.१८ऑगस्ट):-गेवराई तालुक्यातील धानोरा , डिग्रस , जळगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने 400 लोकांच लसीकरण आज होत आहे, लसीकरणासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळत आहे, वयस्कर लोकांना गावातच लसीकरण केल्या मुळे ग्रामस्थांन मध्ये आनंदाच वातावरण आहे, गावातील सर्वांचे लसीकरण करणे हेच कोरोना मुक्त गाव करणे , त्यामुळे ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे, आज सकाळी 10 वाजल्यापासुन 2 वाजेपर्यंत 500 लोकांचे लसीकरण झाले आहे, व 500 लोकांचे लसीकरण होऊ देखील राहिलेल्या लोकांचे लसीकरण करण्या साठी लोकांची नोंद केली आहे.

गावातच लस उपलब्ध झाल्या मुळे वयस्कर, अपंग अशा लोकांची चांगल्या प्रकारे सोय झाली आहे, डाॅक्टर , शिस्टर यांचे गावचे सरपंच सुर्यकांत शिंदे, उपसरपंच शिवाजीराव शिंदे, यांच्या या चांगल्या उपक्रमा मुळे ग्रामस्थांन कडुन त्यांचे कौतुक होत आहे, कोरणा लसीपासुन आज जेवढे वंचित राहिले अशा सर्वांच गावातच लस उपलब्ध करून घेऊ अशे ग्रांमपंचायतच्या वतीने सांगण्यात आले आहे…