व्यवसाय व्यवस्थापन करिअरकडे वाढता कल

67

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)

सातारा(दि.18ऑगस्ट):-नुकताच दहावी बारावीचा निकालानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी पालकांची चिंता वाढली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी करिअर व्यवसाय व्यवस्थापन शिक्षण करण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येते. खर्च कमी आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी असल्याने सध्या व्यवसाय व्यवस्थापन शिक्षण हाच सर्वोत्तम पर्यायास पालकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

सध्या कोरोनाच्या धास्तीत हि मुलांच्या इंजिनिअरिंग, कृषी, मेडिकल प्रवेश परीक्षेने धास्ती वाढवली आहे.जरी प्रवेश मिळाला तरीही या क्षेत्रातील शिक्षण आणि करिअर चांगलेच खर्चिक असल्याने सामान्यांना परवडणारे नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा आता व्यवसाय व्यवस्थापन इंजिनिअरिंग मेडिकल शिक्षण दिवसेंदिवस महाग झाले आहे. अशा या परिस्थितीत कमी खर्चातील व नौकरीसाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य अशा पदवीनंतर लगेच नौकरी मिळणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाकडे पालकांचा व विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

‌वाणीज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बीबीए व बीसीए या तुलनेने कमी खर्चिक पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे.सातारा तालुक्यात बीबीए बीसीए व एमबीए हे व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये सातारा या ठिकाणी असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी होताना दिसत आहे.पदवीच्या अंतीम वर्षात शिकत असणाऱ्या बीबीए व बीसीए विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कॅंपस इन्टरव्हिव आयोजित करून या परिस्थितीत आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बॅंक, माणदेशी बॅंक, इन्फोसिस, हिंदुस्तान फिडस्, आक्मे स्वाॅफ्टवेअर डेव्हलपमेंट या कंपन्यांमध्ये पंचवीस विद्यार्थ्याची निवड होऊन नौकरीत रूजू झाले आहेत.

इन्स्टिट्यूटचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर डॉ सांरग भोला यांनी विशेष परिश्रम घेऊन ऑनलाईन कॅंपस इन्टरव्हिव आयोजित केलेल्या आहेत.
यावर्षी प्रवेश क्षमतेपेक्षा कितीतरी जादा प्रवेश अर्ज आल्याने व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन इन्स्टिट्यूटने नवीन जलद अतिरिक्त तुकडी मान्यतेसाठी विद्यापीठास व महाराष्ट्र शासनास प्रस्ताव सादर केला आहे.या वर्षी विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन शासन मान्यता मिळेल असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की या पदवी अभ्यासक्रमाबरोबर व्यक्तीमत्व विकास, संभाषण चातुर्य, स्वाॅफ्टस्किल, आप्टीट्युड, या बाबींकडे जाणीवपुर्वक लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्या अंगभूत कलागुणांना कौशल्यांना व त्यांच्या आवडी विचारात घेऊन व्यक्तीमत्व विकास केला जातो.

सहभागातून शिक्षण ही संकल्पना राबवल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता वृद्धिंगत झाल्याने कॅम्पस् इंटरव्ह्यू मध्ये मुलांच्या निवडी होत आहेत असे संचालक यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन सर्व इच्छुकांना वाढीव अतिरिक्त जलद तुकडी मध्ये प्रवेश दिला जाईल व प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी सांगितले.