नासिक (ओझर )विमानतळाला नाव देण्यासाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामकरण समितीची बैठक

22

✒️विजय केदारे(नाशिक प्रतिनिधी)

नाशिक(दि.18ऑगस्ट):– कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामकरण समितीच्यावतीने सर्वपक्षीय बैठक *भदंत आर्यनाग यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. नाशिक जिल्ह्यातील (ओझर) विमानतळाला पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील समस्त नेते कार्यकर्त्यांची/आंबेडकरी जनतेची आहे, या संदर्भात कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड नामकरण समिती च्या वतीने राज्याचे कृषिमंत्री, नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री,नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार यांनाही निवेदन देण्यात आले असून लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास जी आठवले हे नाशिक दौऱ्यावर येत असून नामकरण समितीच्या वतीने आठवले साहेबांना देखील निवेदन सादर करण्यात येणार असून केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून नामकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीच्या वतीने त्यांना आग्रह करण्यात येणार आहे.दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समितीचे कामकाज अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने व अचूकपणे सुरू असून समाजातील सर्वच घटकांचा नामकरण समितीला पाठिंबा मिळत आहे.

बैठकीस  दादासाहेब गायकवाड नामकरण समितीचे मुख्य निमंत्रक रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे,बाळासाहेबजी शिंदे,विलास जी पवार,मदन अण्णा शिंदे,अनिल भाई गांगुर्डे,भारत जी पुजारी,दि.ना.उघाडे, दिपचंद नाना दोंदे,भिवानंद आप्पा काळे,संजय जी साबळे,आदेश भाऊ पगारे,दिलीप जी अहिरे,विलासराज गायकवाड, बाळासाहेबजी साळवे,अनिल जी आठवले,कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्रजी गायकवाड, संजय जी तायडे, भारत भाऊ भालेराव, राजाभाऊ गांगुर्डे, समाधान भाऊ औचरमल, अमोल जी मोरे, सचिन संधान, पत्रकार सतीश पवार,विक्रांत गांगुर्डे,संतोष लोखंडे,प्रशांत शिंदे, प्रशांत गांगुर्डे आदी उपस्थित होते.