धरणगाव तालुका शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

26

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.21ऑगस्ट):- येथे समस्त माळी समाज मोठा माळीवाडा, पंच मंडळाची नुकतीच कार्यकारणी घोषित करण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी विठोबा नामदेव माळी, उपाध्यक्ष निंबाजी माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, सचिव गोपाळ माळी, सहसचिव डीगंबर महाजन, विश्वस्त ज्ञानेश्वर महाजन, विजय महाजन यांची निवड झाल्याने धरणगाव शिवसेनेच्या वतीने मा. ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, विभागप्रमुख संजय चौधरी, माजी उपनगराध्यक्ष करण वाघरे, उद्योजक वाल्मिक पाटील, जेष्ठ पदाधिकारी धिरेंद्र पुरभे, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, विनोद रोकडे, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित माळी समाजातील विश्वस्तांच्या शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या.