भैरव भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

26

✒️बीड विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.22ऑगस्ट):- शहराजवळील वासनवाडी शिवारातील आदिवासी समीकरण अनाथ सेवा प्रकल्पामध्ये गेल्या आठ वर्षापासून आदिवासी पारधी समाज बांधवांचे मुले निवासी शिक्षण घेतात.या प्रकल्पामध्ये मुला-मुलींना विविध उत्सवांच्या माध्यमातून संस्काराचे कार्यक्रम राबवले जातात.

रक्षा पौर्णिमेच्या निमित्ताने बहीण-भावाच्या नात्याचा गोडवा या सेवा प्रकल्पातील मुलांना जाणता यावा म्हणून भैरव भोसले सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून अध्यक्ष भैरवनाथ भोसले सर यांनी रक्षाबंधनाच्या महत्व या प्रकल्पातील सर्व मुला-मुलींना समजावून सांगितले.

तसेच पुढील काळात मकर संक्रांत दिवाळीनिमित्त मुलांमध्ये येऊन हे सण साजरा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मुलींनी मुलांना राखी बांधताना राखी बांधून मिठाई खाऊ घातली तसेच मुलांनीही सर्व मुलींकडून आनंदाने राखी बांधून घेतल्या.या कार्यक्रमाला सेवा प्रकल्पाचे संचालक सुधीर भोसले,ऐश्वर्या भोसले,नीता भोसले,मनीषा काळे उपस्थित होते.