असे होऊ शकते?? शिवसेना नेते एकनाथ शिंदे भाजपच्या वाटेवर?

30

✒️मुंबई विभागीय प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.23ऑगष्ट):-शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री, एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये कंटाळलेले आहे. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री, नारायण राणे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये नाराज असून, प्रत्येक कामासाठी त्यांना मातोश्रीची परवानगी घ्यावी लागत असल्यामुळे, ते आता शिवसेना सोडून, भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत, असे ही सांगितले.

या नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री, नारायण राणे यांनी सध्या ‘ जन आशीर्वाद यात्रा ‘ सुरू केली आहे. जन यात्रेमध्ये वसईत पत्रकारांना बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री, नारायण राणे हे सध्या जनयात्रेमध्ये व्यस्त असून, ते शनिवारी पालघरमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

या जन यात्रेच्या स्वागतासाठी, चिंचोली येथे ढोल ताशाच्या गजरात, तसेच आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.या जन यात्रेच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला असता, त्यानी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील कार्यपद्धतीवर ही जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना चिरंजीव मंत्री म्हणत, ही टोला लगावला आहे. राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री, नारायण राणे यांनी केलेल्या गौप्य स्फोटामुळे, पुन्हा आगीत तेल ओतले असल्याचा प्रकार झाला आहे.