नशाबंदी मंडळातर्फे व्यसनमुक्ती रक्षाबंधन अभियान संपन्न ….

26

🔹नशाबंदी मंडळातर्फे व्यसनमुक्ती रक्षाबंधन अभियान संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली (दि.23ऑगस्ट):-नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली , नवदृष्टी युवती मंडळ साखरा आणि चाईल्ड लाईन गडचिरोली इत्यादी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील विविध कार्यालयात तसेच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन “व्यसनमुक्तीशी बंधन – व्यसनापासून रक्षण” अभियानाअंतर्गत रक्षाबंधन करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार , उपाध्यक्ष मनोहर पोरेटी , मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद , समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम , शिक्षणाधिकारी हेमलता परसा, पं.स.सभापती मारोतराव ईचोडकर ,उपसभापती विलास दशमुखे , संवर्ग विकास अधिकारी एम. एस. महेर तसेच गडचिरोली पोलिस स्टेशनचे मुख्य पोलिस निरीक्षक पी.जी. बानबले, ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आदींना रक्षाबंधन करण्यात आले. नशाबंदी मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक करून या अभियानास शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार , नवदृष्टी युवती मंडळाच्या सचिव अर्चना चुधरी , नशाबंदी मंडळाच्या पदाधिकारी अर्चना जनगनवार , चाईल्ड लाईनच्या समुपदेशीका सुनिता पिंपळशेट्टीवार , सदस्या तृप्ती पाल ,भारती जवादे , प्रकाश गुरनुले आदींनी सहभाग घेत अभियानाची माहिती संबंधित मान्यवरांना दिली . देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात व्यसनमुक्तीचे बंधन व्यसनांपासून रक्षण या कार्यक्रमाद्वारे समाजात वाढत्या व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून महिला वर्गाचे रक्षण करावे आणि व्यसनमुक्तीसाठी पुरक वातावरणाची निर्मिती करावी ह्या हेतूने राज्यात जनजागृती करण्यात येत आहे .तसेच या संबंधित जनजागृतीपर पत्रके वितरण करण्यात आले .