पेठ बीड भागातील असंख्य युवकांचा जनता दल मध्ये प्रवेश

26

🔸तालुका सचिव पदी पठाण जावेद तर शहर सचिवपदी शेख जमीर यांची निवड

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.24ऑगस्ट):- शहरातील तेलगाव नाका,गांधीनगर पेठ बीड भागातील असंख्य युवकांनी जनता दल मध्ये जाहीर प्रवेश केला असून यावेळी पठाण जावेद यांची युवक जनता दलाच्या बीड तालुका सचिव पदी तर शेख जमीर यांची शहर सचिव पदी निवड करण्यात आली आहे.सविस्तर असे की बीड शहरातच नव्हे तर जिल्ह्यात जनता दल पक्षाला भरभराटी आली असून असंख्य युवक जनता दल मध्ये प्रवेश करत असून समाजाच्या विविध स्तरातील घटक पक्षाशी जुळत आहे.

याचाच एक भाग बीड शहरातील तेलगाव नाका,गांधी नगर पेठ बीड भागातील शेख शाहरुख,शेख सोहेल,शेख समीर,पठाण अनिस,सोहेल मणियार,शेख जावेद,शेख नासेर,शेख जाफर,शेख निजाम,शेख सलीम,शेख शफिक,शेख इरफान यांच्यासह असंख्य युवकांनी रविवार रोजी जनता दलाच्या जिल्हा कार्यालय येथे जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव प्रा.सुशीलाताई मोराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष पठाण अमरजान यांच्या नेतृत्वात खाली जाहीर प्रवेश केला असून यावेळी पठाण जावेद यांची युवक जनता दलाच्या बीड तालुका सचिव पदी निवड करण्यात आली तर शेख जमीर यांची शहर सचिव पदी निवड करण्यात आली.

यावेळी शेख अब्बास ( युवक जिल्हा उपाध्यक्ष ),शेख सलमान ( शहराध्यक्ष ) शेख रिजवान ( कोषाध्यक्ष ) व शेख वसीम यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा स्वागत करत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.