महेंद्रसिंह चंदेल यांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश

28

🔹चंदेल यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी,चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा)मो:-९८५०८०१३१४

चंद्रपूर(दि.२५ऑगस्ट):- जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील महेंद्रसिंह बबनसिंह चंदेल व दामोधर गरपल्लीवर यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश करताच महेंद्रसिंह चंदेल यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

चंद्रपूर जिल्यातील गोंडपिपरी तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सक्रीय असणारे तथा आपल्या सामाजिक, राजकीय व अन्य रचनात्मक कामाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे महेंद्रसिंह चंदेल व गोंडपिपरी पंचायत समितीचे अकरा वर्ष सभापती पदाची जबाबदारी सांभाळणारे किसनराव गरपल्लीवर यांचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते तथा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक दामोधर गरपल्लीवर यांनी मुंबई येथे पक्ष कार्यालयात प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी ना. राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजेश कवठे, सुनील दहेगावकर, मुनाज शेख, कुणाल गायकवाड, राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूरचे जेष्ठ पत्रकार डी. के. आरीकर, नितेश मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

महेंद्रसिंह चंदेल यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. महेंद्रसिंह चंदेल यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कामाने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष संघटन मजबूत होईल व त्यांच्या सोबत असलेला जनसमुदाय हा पक्ष हितासाठी काम करेल असा विश्वास चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी व्यक्त केला.