खोटी व चुकीची माहिती देऊन कागदपत्र तयार करणाऱ्यावर यांच्यावर कायदेशीर चौकशी करून गुन्हा दाखल करा

114

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

शिंदखेडा(दि.24ऑगस्ट):- शहराचे तहसीलदार श्री सुनील सैंदाणे यांनी मिना अशोक बोडके उर्फ मिनल सुनील सैंदाणे, ओमकार दिलीप मिश्रा उर्फ हर्षवर्धन सुनिल सौन्दांणे,गायत्री दीपक गांगुर्डे, रोहित राजेंद्र जैन सर्व राहणार १० आनंद कॉम्प्लेक्स, प्रोफेसर कॉलनी,जय हिंद कॉलेज रोड धुळे मनोहर बाबुराव केदार नाशिक प्रिन्सिपल चावरा वंडर किड्स स्कूल धुळे, प्रिन्सिपल प्रोडिगी पब्लिक स्कूल, वाघोली पुणे संदीप जितेंद्रकुमार कन्सरा रा.वाघोली पुणे यांनी संगनमत करून खोटी व चुकीची माहिती देऊन शाळा सोडल्याच्या दाखल्यावर बोर्डाचे सर्टीफिकीट नावात बदल केल्याचे (राज) इत्यादी सरकारी कागदपत्रांवर आर्थिक मोबदला घेऊन बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याने त्यांची विरुद्ध आयपीएस कलम ४२०,४१९,४६५,४६८,४७१,१२०,(ब)व कलम ३६ प्रमाणे कायदेशीर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावे.

वैशाली सुनील सैंदाणे वरील ठिकाणी माझे मुलगा व मुलगी असे राहत असून माझ्या विवाह सन २००१ मध्ये सुनील महादू सैदाणे यांच्या सोबत झालेला असून सदर विवाह संबंधातून आम्हाला दोन अपत्य मुलगी अनघा सुनील सैंदाणे वय १८व मुलगा आदित्यवर्धन सुनील सैंदाणे वय १२ असे असून आमची पती-पत्नी संबंध कायम आहेत असे सांगितले.

लग्नानंतर १४ वर्षे एकत्र संसार करून माझे पती सैंदाणे यांनी माझ्या मानसिक शारीरिक छळ करून इतर महिला सोबत विवाह ब्रह्म संबंध ठेवून माझ्या व मुलाच्या त्याग करून वरील ठिकाणी राहत आहे. दरम्यानचे काळात त्यांनी विनाशक बोकडे बरोबर युवा ब्रह्म संबंध ठेवून कुठलाही कायदेशीर विवाह झालेला नसतांना स्वतः तहसीलदार असल्याचा अधिकाराचा फायदा घेऊन सरकारी कागदपत्रावर खोटी व चुकीची माहिती देऊन तसेच कुठल्याही कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करता शाळेच्या दाखला,बोर्डाची सर्टिफिकेट महाराष्ट्र शासन नावात बदल करून मिळवण्यासाठीचे परिपत्रक तसेच आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांवर खोटी माहिती व दस्तावेज देऊन फसवणूक केलेली आहे.

वरील इसम यांनी सदर महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवताना तिला कायदेशीर पत्नी असल्याबाबत बतावणी करून कागदपत्रांवर निनम सुनील सैंदाणे असे नावाच्या सरकारी कागदपत्र नामनिर्देशित केलेले आहे. तसेच सदर कागदपत्राच्या आधारे मीना अशोक बोडके तिचा विवाह दिलीप मिश्रा याच्या बरोबर झालेला होता.सदर विवाह संबंधातून मीना हिला ओमकार दिलीप मिश्रा हा झाला होता त्यानंतर दोघांनी वैवाहिक संबंध बंद करून सुनील सैंदाणे सोबत राहत आहे. दरम्यानच्या काळात कोणतेही कायदेशीर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला नसतांना सुनील सैंदाणे यांनी मीना मिश्रा हिला पत्नी असल्याच्या दर्जा देऊन कागदपत्रावर पत्नी असलेले उल्लेख केला आहे.