धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने श्री. पाटील, माळी व वाघ यांचा सन्मान

36

✒️प्रतिनिधी धरणगांव(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.२५ऑगस्ट):- २०२१ रोजी धरणगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने महात्मा फुले हायस्कूल चे शिक्षक पी.डी.पाटील, हेमंत ज्ञानेश्वर माळी व आबासाहेब राजेंद्र जगन्नाथ वाघ यांची समस्त माळी समाज सुधारणा मंडळाच्या सल्लागार पदी निवड झाल्याकारणाने धरणगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ऍड.भोलाणे यांनी सांगितले की सत्कारमुर्ति सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. जसे की, महापुरुषांच्या जन्मदिनी व्याख्यान, जनजागृती, विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप, स्पर्धा परीक्षापर मार्गदर्शन, समाज उपयोगी कार्यात भरभरून मदत अशा नानाविध सर्व समाजोपयोगी कार्यांची यांनी केलेल्या कार्याची दखल घेत, पत्रकार संघातील सर्व सदस्यांनी धरणगाव तालुक्यातील चळवळीत व समाजमनात सर्वांना परिचित असलेले बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक हेमंत माळी व पी.डी.पाटील यांचा धरणगाव अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड.व्ही. एस.भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी, जेष्ठ पत्रकार विजयकुमार शुक्ला शौर्य मराठी, बी.आर.महाजन दिव्य मराठी, शैलेश भाटिया देशदूत अधिकृत फोटोग्राफर, जितेंद्र महाजन लोकनायक, धर्मराज मोरे देशोन्नती, भगीरथ माळी जागर जनस्थान, विनोद रोकडे लोकशाही, किरण चव्हाण लोकपत्रिका, बाबूलाल बडगुजर लोकमत, सतीश शिंदे महाराष्ट्र न्यूज, प्रभूदास जाधव सामना, प्रा.मंगेश पाटील दै.बाळकडू, निलेश पवार सर्कल ऍप, कमलाकर पाटील साईमत, सतीश बोरसे गावकरी, योगेश पी पाटील बुलंद पो.टा., हर्षल चौहान महाराष्ट्र सारथी, भरत शिरसाठ, करीम भाई, हसनलाल, महेंद्र तायडे आदी सन्माननीय पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या.