अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रोमांचकारी घटनांवर दिनदर्शिका प्रदर्शित

35

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

सातारा(दि.25ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेमार्फत .भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटना व प्रसंगावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेसाठी विषय व नियमावली ठरवण्यात आली. त्यासाठी संस्थेतील पुणे ,सांगली, सातारा, वाई, नागोठणे येथील इंग्रजी व माध्यमिक शाळातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती .या स्पर्धेच्या नियोजनानुसार संस्थेतील कलाशिक्षक व इतिहास शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून दिनदर्शिका डोळ्यासमोर ठेवून महिनावार विषय ठरवण्यात आले.

त्यासाठी इ .स.1857 ते1947 या 90 वर्षाच्या कालावधीतील ज्या क्रांतीकारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेली धाडसी कृत्य, आत्म बलिदान, इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला कडवा विरोध , विविध चळवळी या सर्व घटनांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या पुढे चित्ररूपाने कसं मांडता येईल  यासाठी  प्रत्येक ऐतिहासिक घटनांची विषयावर  लिखित स्वरूपात माहिती  विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा  ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन कलाशिक्षक व इतिहास शिक्षक यांनी केलेले आहे .शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने . डे .ए . सोसायटी पुणे चे संचालक  प्रशांत गोखले यांच्या संकल्पनेतून संस्थेचे अध्यक्ष डॉ . शरद कुंटे, उपाध्यक्ष – महेश आठवले, कार्यवाह -धनंजय कुलकर्णी ,स्वाती जोगळकर  ,सविता केळकर शबनम तरडे  आदींनी संस्थेमध्ये दिनदर्शिका चित्रकला स्पर्धा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला .  .      

   डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे म्हणाले ‘लाखो कार्यकर्ते यांच्या सहभागातून स्वातंत्र्याचे मंदिर उभे राहिले. हजारो क्रांतिकारकांनी बलिदान केले .स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून त्यांचे स्मरण केले पाहिजे .देशाच्या भवितव्याला उंची देण्यासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचा संकल्प या निमित्ताने प्रत्येकाने केला पाहिजे’असे आवाहन व संदेश दिनदर्शिका प्रकाशित करतेवेळी भारतवासियांना दिलेला आहे .

                         डेक्कन एज्युकेशन संस्था पुणे संचलित 14 शाळांमधील 228 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता . आणि या चित्रांचे परीक्षण कलाशिक्षक व इतिहासशिक्षक यांनी परिक्षण करून बारा महिन्यांची बारा चित्र निवडण्यात आली . यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेतील बारा चित्रांपैकी तीन चित्रांची निवड कॅलेंडर साठी करण्यात आली आहे . यातील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे _ १ )जानेवारी महिन्यासाठी विषय – भाई कोतवाल -कु . श्रीया किरण प्रभुणे .२ )ऑक्टोबर महिन्यासाठी विषय – सायमन गो बॅक -लाला लजपत राय – कु .भूमिका संतोष दिवटे .३ )नोव्हेंबर महिन्यासाठी विषय -क्रांतिकारी सेनापती बापट -कु . सानिका प्रकाश फडतरे .या तिन विद्यार्थीनींच्या चित्रांची दिनदर्शिकेसाठी निवड झालेली असून या दिनदर्शिकेचे पुणे मध्ये समारंभपूर्वक प्रदर्शित करण्यात आली असून स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे व न्यू इंग्लिश स्कूल सातारा यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेतील इतिहास शिक्षक श्रीनिवास कल्याणकर ,कलाशिक्षक -घनश्याम नवले ,संदीप माळी यांचाही संस्थेमार्फत व शालामाऊली तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचे चेअरमन व डेक्कन एज्युकेशन सोसायटी च्या नियामक परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी , न्यू इंग्लिश स्कूल सातारा , शालाप्रमुख – सुनील शिवले ,नविन मराठी शाळेच्या शालाप्रमुख -सौ. मनिषा चव्हाण  ,बालक मंदिर साताराच्या शालाप्रमुख -सौ. मंजिरी देशपांडे  उपस्थित होते .तसेच साताऱ्यातील डे. ए. सोसायटीच्या सर्व शाळांचे पदाधिकारी , सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.