किशोर सोनवणे यांच्या प्रयत्नाना यश;पिडीत महिलेला मिळणार न्याय;म्हसवड पोलीस स्टेशनने केला गुन्हा दाखल

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27ऑगस्ट):-स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी म्हसवड पोलीस स्टेशनचे स.पो.नि.ढेकळे यांनी एका पिडीत महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास केलेल्या टाळाटाळ विरोधात रिपाई उपजिल्हाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी पीडित महिलेस न्याय मिळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर आरोपी विरोधात म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला.

सदर आंदोलन स्थगित करावे यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनकडून किशोर सोनवणे यांना लेखी निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये म्हटले आहे की मा.जिल्हाधिकारिसो व मा.पोलीस अधीक्षकसो सातारा यांना दिलेल्या निवेदनात आपण स.पो.नि.ढेकळे यांनी आपल्या स्वतःचे आर्थिक लाभापोटी बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत,बलात्काराचा गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आपण शुक्रवार दि.27/08/2021 रोजी म्हसवड पोलीस स्टेशन समोर पीडित महिला व त्याच्या कुटूंबिया सोबत ठिय्या आंदोलन करणार आहात असे पत्र दिले त्यानुसार पीडित महिलेच्या कुटूंबियांना बोलावून सविस्तर माहिती घेतल्यानंतर आरोपी प्रदीप शिंदे यांच्या विरोधात पोलीस ठाणे गु.र.नंबर 141/2021भादविस कलम 376,376(क),(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून पीडितेस फूस लावून पळवून नेलेचे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.भंडारे यांच्या कडे वर्ग करणेत आला असून पीडित महिलेचा लवकरात लवकर तपास करणेत येईल.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार व वरील दिलेल्या कलमानुसार गुन्हा दाखल करणेत आला असून आपण जिल्हाधिकारीसो व पोलीस अधिकक्षसो यांना दिलेल्या निवेदनानुसार नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित करावे.
यादरम्यान म्हसवड पोलीस स्टेशनकडून आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून त्यास तात्काळ अटक करण्याचे लेखी मिळाल्यानंतर नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित करीत असल्याचे रिपाई उपजिल्हाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी सांगितले.

किशोर सोनवणे पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाले यापुढे म्हसवड पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यास टाळाटाळ केली तर पोलीस स्टेशन विरोधात आंदोलन हे होणारच.ज्या कोणावर अन्याय होत असेल त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाशी संपर्क साधावा.यावेळी किशोर सोनवणे यांनी त्यांच्या आंदोलनात पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कने आपली बातमी देऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले.यावेळी पीडित महिला व तिच्या कुटूंबियांना म्हसवड पोलीस स्टेशन वेळोवेळी जाऊन सुद्धा गुन्हा नोंद करून घेत नसताना रिपाई उपजिल्हाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी आम्हला न्याय मिळावा म्हणून केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले व धन्यवाद दिले.