बोरगाव-माळेवाडी अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास मज्जाव प्रकरणाचा आवाज मंत्रालयात घुमला

24

🔹मंत्रालयात वैभव गीतेंचा आक्रमक पवित्रा….अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांचे पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुबंई(दि.२७ऑगस्ट):- – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी या गावात मातंग समाजाच्या धनाजी अनंता साठे यांचे प्रेत अंत्यविधी करण्यासाठी गावातील रवींद्र शहाजी पाटील सह 13 जणांवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 20/8/2021 रोजी एट्रॉसिटी व भादवी च्या कलमान्वये गुन्हा दाखल असूनसुद्धा आरोपींवर कडक कारवाई झाली नसल्याने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ठाणे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी थेट मंत्रालयात जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सनदी अधिकारी अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्या केबिनमध्ये घुसून जाब विचारला वैभव गिते व संदेश भालेराव यांचा आक्रमक पवित्रा पाहून अपर मुख्य सचिव यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

आरोपींवर कडक कारवाई करण्याचे लेखी निवेदन देऊन चर्चा केली.राज्याचे पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागितला.आठ दिवसात कारवाई न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा वैभव गिते यांनी शासनास दिला आहे.त्यामुळे मंत्रालयीन वातावरण गंभीर व गरम झाल्याचे दिसत होते.