दोंडाईच्यात दहीहंडी व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीचे बैठक संपन्न

29

🔸भाजप शहर शहराध्यक्ष घरफोडीच्या विषयावर आवाज उठवल्याने शिरपूरचे उपविभागीय अधिकारी भडकले..

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.28ऑगस्ट):-काल 27 रोजी साडेपाच वाजेला दोंडाईचा पोलीस ठाण्यात शिरपूर उपविभागीय अधिकारी अनिल माने यांच्या अध्यक्षतेखाली दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली यात गावातील राजकीय पदाधिकारी आजी माजी नगरसेवक व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांचे भाषण झाली. याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष प्रविण महाजन यांच्या भाषणात त्यांनी शहरात वाढत्या घरफोड्या संदर्भात बोलले असता, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने आक्रमक झालेले बघण्यास मिळाले. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांसमोर उपविभागीय अधिकारी अनिल माने व भाजपा शहर अध्यक्ष प्रविण महाजन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.

होऊ घातलेल्या दहीहंडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दोंडाईचा पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्तांनी व गणेशभक्तांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शहरातील समस्या देखील या निमित्ताने मांडण्यात आल्या.
शिरपूर उपविभागीय अधिकारी अनिल माने बोलतांना म्हणाले की, कोविड विषाणूच्या संभाव्य तिसरा लाटेचा धोका टाळावा म्हणून शासनाच्या वतीने जे नियम लावण्यात आले त्याचे पालन करून गणेश उत्सव साजरा करावा. नियमाचा कुठे भंग होणार नाही याची काळजी गणेशभक्तांनी घ्यावी..

भाजपा शहर अध्यक्ष प्रविण महाजन हे विविध मुद्द्यावर भाषण करत असतांना बैठकीनिमित्ताने वरिष्ठ अधिकारी आले असल्यामुळे शहरातील ईतर समस्यावर देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आधी शांतता समितीच्या बैठकीत मंडप टाकून लाऊसस्पिकर लावून बैठक होत असे. तसेच पुढे बोलतांना सांगितले की, शहरात मोठ्या प्रमाणावर चोरट्यांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या होत आहे. चार ते पाच मोठ्या लाखाच्या वरील घरफोड्या झाल्या आहे. तरी देखील गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलीसांना अपयश येत असे बोलत असतांना शिरपूर उपविभागीय अधिकारी अनिल माने यांना या गोष्टींचा राग आल्याने आक्रमक झालेले पाहवयास मिळाले. यात दोघांमध्ये भर बैठकीत शाब्दिक चकमक उडाल्याने शांतता कमेटीच्या बैठकीतच अशांतता झाल्याची चर्चा शहरात होती.

बैठकी प्रसंगी शिरपूर उपविभागीय अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, साहय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, प्रविण महाजन, जितेंद्र गिरासे, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, खलील बागवान, जेष्ठ पत्रकार जे पी गिरासे, शैलेश सोनार, रामभाऊ माणिक कल्लू पठाण, राहूल माणिक, आकाश भोई, राज ढोले, सागर पवार, गणेश विसावे, दिनेश भोई, भावेश जैन, निखील जयसिंघानी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गणेश भक्त आजी माजी नगरसेवक राजकीय समाजीक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते..