मांडवा येथे स्मार्ट कॉटन अंतर्गत शेती कार्यशाळा संपन्न

34

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28ऑगस्ट):- तालुक्यातील मांडवा येथे शेतकरी सखाराम चव्हाण यांच्या शेतात शेतकरी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी कृषी सहायक एस.पी.जाधव,सचिन सांगाडे बि.सी.आय. ,बाळु पुलाते कृषी समन्वयक मांडवा यांनी शेतकऱ्यांना बोंड आळी नियंत्रण ,फवारणी करताना घ्यावयाची काळजी ,पांढरी माशी नियंत्रण ,औषधी खरेदी करताना पक्के बिल घेणे, औषधावरिल चिन्हाबद्दल माहिती देण्यात आली, तसेच फेरोमोन्स ट्रप वाटप व फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.

शेती कार्यशाळा ही शेतकरी सखाराम चव्हाण यांच्या शेतात घेण्यात आली.

यावेळी पो.पा. दत्तराव पुलाते शेतकरी अनिल पुलाते ,हनुमान ईखार, शरद साखरे, उमेश पुलाते,राघोजी ढोले, दगडु ढोले, रमेश ढोले, किरण ढोले, आश्विन सुपले, किरण पुलाते, सुमित राठोड, संतोष राठोड, देवराव आबाळे, गजानन आबाळे, रामदास आबाळे, महादेव पारध, गजानन पुलाते, प्रविण घुक्से, विठ्ठल आडे, कैलास राठोड, काशीनाथ मंदाडे, अविनाश आडे, नयन आडे, रमेश आबाळे, रितेश राठोड, गोविंद आबाळे दिपक आडे, विठ्ठल राठोड, संतोष पुलाते ,संजय पुलाते,उत्तम पुलाते, विकास राठोड, श्रीराम पुलाते, संतोष पुलाते ईत्यादी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.