केंद्र सरकार ई-श्रम कार्ड योजना- सलून चालक,मालक आणि सलून कारागिरांसाठी सुवर्णसंधी

34

सध्या केंद्र सरकारने देशातील असंघटीत कामगारांसाठी म्हणजेच घरगुती कामे करणाऱ्या महिलांसाठी,सुतार,गवंडी,सलूनचालक,मालक,सलून कारागीर,लोहार,सुरक्षा कर्मी,प्लंबर, भाजी विक्री करणारे असे अनेक बारा बलुतेदार असंघटित कामगार वर्गासाठी ही योजना आहे,भविष्यात शासकीय अनुदान खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक असेल!.
सर्व कामगार मग ते कोणत्याही प्रकारचे असो त्यांना मिळणार श्रमिक ओळखपत्र त्याच्या आधारे सरकार संबंधित व्यक्तीला त्या बाबतीत सरकारी योजनेचा लाभ देईल.श्रमिक कार्ड योजना,सरकारी दफ्तरी अश्या असंघटित कामगाराची नोंद होणार आहे.येणाऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने मध्ये शामिल केले जाईल.येणारी सरकारी कामे सुद्धा दिली जातील.

कोण नोंदणी करू शकत नाही ??.१)ज्यांचे पीएफ मध्ये पैसे जमा होतात २) ज्यांचे ESIC चा विमा आहे.३) जे इन्कमटॅक्स भरतात असे कामगार या योजनेमध्ये येत नाहीत. ह्या कार्ड साठी लागणारे कागद पत्रे १) आधार कार्ड २) व्यवसाय/कामाचा तपशील 3)बँक खाते पासबुक या योजनेचा लाभ मिळवण्या साठी तुम्ही कोणतेही काम करत असेल बांधकाम,सलून चालक,मालक, सलून कारागीर,सुतार काम,नळ व इतर बांधकाम विषयक कामे,शेत मजूर, हमाली, रिक्षा चालक,लहान दुकानदार,फेरीवाले, हातगाडी वाले,घरकाम वाले, इतर कोणतेही काम करणारे यांना याचा लाभ घेता येईल.

सदर योजना अत्यंत सोपी आणि विनामूल्य असून सेव्ह सलोन इंडिया, राष्ट्रीय जनसेवा पक्ष,नाभिक महामंडळ आणि समाजातील इतर संघटना याचा पाठपुरावा करीत आहेतच,तरी सर्वांनी खालील लिंकचा वापर करून आपले वैयक्तिक कार्ड काढून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि ही माहिती जास्तीत जास्त समाज बांधवा पर्यंत पोहचविण्यासाठी मदत करावी,असे आवाहन करण्यात येत आहे.

✒️लेखक:-संजय पंडित(उपाध्यक्ष
राष्ट्रीय जनसेवा पक्ष)
http://www.eshram.gov.in
मो.९८१९६३७४६१,
कळवा जिल्हा ठाणे