महाराष्ट्रातील मंदिरे  उघडण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची पुजा

31

🔸नाही तर मातोश्रीवर जाऊन उद्धवांना घालणार साकडे

✒️प्रतिनिधी बुलढाणा(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.29ऑगस्ट): – महाराष्ट्रातील मदिरालय, वेश्यालय, अवैध धंदे राजेरोसपणे सुरू असताना मंदिरेच बंद का..? हिंदूंच्या मंदिराचे सरकारला वावडे आहे का..? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यासाठी शेतकरी शेतमजुरांनी बुलडाणा येथील राजुर घाटातील बालाजी मंदिरावर जाऊन आझाद हिंद शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराष्ट्रातील मंदिरे उघडे करा अन्यथा आक्रोश मोर्चा घेऊन मातोश्रीवर येऊन उद्धवांना साकडे घालु असा इशारा यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे..

यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
सतीशचंद्र रोठे, महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे, महिला प्रवक्ता एँड. रीनाताई वर्मा,
प्रदेश संघटक मोहन सोळंके, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे युवक  जिल्हाध्यक्ष विनोद जवंजाळ, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख आदेश कांडेलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.