आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांची दबंग गिरी ??

24

🔺तक्रारदारास जीवघेणी मारहाण??

✒️गडचिरोली,जिल्हा प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.31ऑगस्ट):- जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गणेश जंगले यांची हुकूमतशाही, मुजोरी अगदी शिगेला पोहोचली असून ” हम करे सो कायदा ” ही परिस्थिती आष्टी पोलीस स्टेशन मध्ये निर्माण झालेली आहे. अगोदरच आष्टी पोलीस स्टेशन वेगवेगळ्या कारणाने बदनाम आहे. चामोर्शी तालुक्यातील व आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कडोली या गावातील प्रफुल ताराचंद श्रीराम या तरुणाने आष्टी पोलीस स्टेशन मध्ये बंडू सोयाम व कुंदा सोयाम यांच्या विरोधात तक्रार नोंदवायला गेले असता आष्टी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी प्रफुल या व्यक्तीची तक्रार न घेता त्याला एका खोलीत बंद करून लाथा – बुक्क्यांनी पोटावर, हातावर,पायावर,छातीवर व मानेवर बेदम अशी जीवघेणी मारहाण केलेली आहे.

तसेच तक्रारदाराला दीड ते दोन तास मुसळधार पावसामध्ये तातकडत उभे ठेवून तक्रारकर्त्यांच्या पत्नी व आई पुढे अश्लील ,घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करून पत्नी व आईची मानहानी सुद्धा केलेली आहे .या पुढे पुन्हा तक्रार देण्यास आष्टी पोलीस स्टेशनला आल्यास आष्टी परिसरात तुला फिरकू सुद्धा देणार नाही अशी धमकी, दमदाटी सुद्धा या गणेश जंगले नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने दिलेली आहे . प्रफुल शिडाम यांना होत असलेली जीवघेणी मारहाण व होत असलेल्या वेदना बघून आष्टी पोलीस स्टेशन ची महिला उपनिरीक्षक यांनी स्वतः पुढाकार घेऊन रात्रो दिड ते दोनच्या सुमारास तक्रार दाराची तोंडी तक्रार लिहून घेतली . प्रफुल सिडाम यांना गंभीर स्वरूपाची मारहाण असून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलेले आहे.

तक्रारदाराने सदर घटनेची तक्रार पोलीस अधिक्षक गडचिरोली यांना दिलेली असून आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे . या भयंकर मारहाणीच्या घटनेमुळे तक्रारदार हा भयभीत झालेला असून प्रफुल शिडाम यांच्या जीवितास केव्हाही धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे पराकोटीचे लक्ष वेधून अन्यायग्रस्ताला योग्य न्याय द्यावा. आणि दोषी असलेल्या संबंधित पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांना तात्काळ बडतर्फ करून पुढील चौकशी सुरू करावी.. अशी मागणी केली जात आहे. जिल्हा पोलीस प्रशासन सदर प्रकरणात कशाप्रकारे न्याय देणार आहे. याकडे लक्ष वेधले आहे.