“मराठा सेवा संघ” वैभवशाली भारतासाठी आशेचा किरण

30

(१ सप्टेंबर,मराठा सेवा संघ या महान सामाजिक चळवळीच्या वर्धापण दिनानिमित्ये)

एकीकडे जातीय धर्मांध कट्टरवादाचे जहाल विष तर दुसरीकडे पुरोगामी च्या नावावर टोकाची भुमिका यातून होणाऱ्या जातीय धार्मिक संघर्षरुपी रोगाने पंचेवीस वर्षापूर्वी भारताचं सामाजिक जीवन होरपडून निघत होतं, परंतु १ सप्टेंबर १९९० ला मराठा सेवा संघाची स्थापना ही या रोगावरील नव संजीवनी च्या रुपाने या देशाला वरदान ठरली.मराठा सेवा संघाच्या वैचारिक क्रांतीने जातीय धार्मिक अंधश्रद्धेच्या दंगलरुपी रोगातुन देशाला दंगल मुक्त करुन प्रगतीची नवी दिशा दिली.आधुनिक युगातील महान पुरोगामी चळवळ ‘मराठा सेवा संघ’ या नावाने फार विचारपुर्वक छ.शिवरायांच्या सैन्यातील अठरापगड जातीतील मावळा म्हणजे मराठा या व्यापक अर्थाने १ सप्टेंबर १९९० ला मा.पुरुषोत्तम खेडेकर या धेय्यवेड्या मानसाने उच्च विद्या विभुषित लोकांना संघटीत करुन मराठा सेवा संघ या चळवळीच रोपटं लावलं, बघता बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला,या वटवृक्षाच्या फांद्या ३३ कक्षाच्या रुपाने विस्तारल्या,भारतीय समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विवेकी लोकांना संघटीत करुन या वटवृक्षाचा विस्तार झाला.

जणू एका नव्या युगाची सुरुवात या युगपुरुषाने केली.समाजजागृतीसाठी साहित्य लेखन करुन पुरोगामी विचाराची बहुजन समाजात पेरणी केली.
मराठा सेवा संघ या मातृसंघटनेच्या अधिनस्त ३३ कक्ष समाजोन्नतीचा हा गाढा जोमाने पुढे नेत आहे. त्याची थोडक्यात ओझरती ओळख करुन घेऊ या.

*”संभाजी ब्रिगेड”*
या नावाने तरुणांच संघटन उभे करण्यात आले.
या कक्षाच्या रुपाने देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे.या देशातल्या तरुणांना समाज विघातक,धार्मिक विद्द्वेशाच्या,कट्टरवादाच्या धार्मिक दहशतवादाच्या जहरीली विळख्यातून, मादक पदार्थाच्या व्यसनातून परावृत्त करुन त्यांच्या भावी आयुष्याची होणारी राखरांगोळी रोखून,तरुणांच्या जीवनात त्याच्या भविष्याची नवी सोनेरी पाहाट आणण्याचं व देशामध्ये जाती धर्मातील सलोखा व बंधुभाव राखण्याचं,महिलांच्या रक्षणाचं प्रसंशनीय कार्य संभाजी ब्रिगेड करत आहे.१००% राजकारण १००% समाजकारण हे धेय्य डोळ्यासमोर ठेवून देशाच्या प्रगतीच व जनतेच्या सुखशांतीच एकमेव सुत्र “शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि नशामुक्त गाव” हे ब्रिदवाक्य घेवून वाटचाल करत आहे. जनतेने संभाजी ब्रिगेड ला राजकीय संधी अवश्य द्यावी देशाच्या प्रगतीसाठी संभाजी ब्रिगेड ची ब्लु प्रिंट तयार आहे. संभाजी ब्रिगेड च्या नजरेतील भारत घडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकिय क्षितिजावर एका नव्या मंगलमय पहाटेचे स्वप्न साकारण्यास जनताजनार्धनाच्या आशीर्वादाने सर्व शक्तीनिशी जनतेच्या सेवेस समर्पित आहे.

संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला सुखी संपन्न प्रगतीशील आदर्श देश घडविण्याचे धेय्य डोळ्यासमोर ठेवले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या तमाम जनतेला सहकार्य करण्याचे आव्हान करीत आहे. संभाजी ब्रिगेड च्या नजरेतील अधोरेखीत धेय्य व उद्दिष्ट उदंड आत्मविश्वासाने जनतेसमोर ठेवण्यात येत आहे.*शेतकरी,सर्वात प्रथम जगाच्या पोशिंद्यावर गळ्यात फास घेण्याची या व्यवस्थेन आणलेली वेळ यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची बिनाशर्त सरसकट कर्जमाफी करुन त्याच्यावर कर्ज घ्यायची वेळच येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणार यासाठी यथाशिघ्र स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करुन शेतमालाला हमीभाव देण्यात येईल.शेतकऱ्यांना शेतात जाण्यास प्रत्येक शेतासाठी पक्के रस्ते बांधणार.नदीजोड प्रकल्प राबवून बारमाही पिकांसाठी शेतात मुबलक पाणी व सिंचनाची सोय करण्यात येवून दुष्काळावरील कायमस्वरुपी उपाय योजणार. शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास मोफत विज देणार.शेतकऱ्यांना यापुढे बँकांकडून कर्ज घ्यावे लागणार नाही त्याऐवजी सरकारकडूनच हेक्टरी १ लाख रु.अनुदान देण्यात येवून यापुढे एकही शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करणार नाही याची व्यवस्था करणार.

भुमीहीनांना शासकीय जमिनीतून हक्काचे पक्के पट्टे देण्यात येईल.आदीवासींचा त्यांच्या जल जमीन जंगलावरचा अधिकार कोणीही काढू शकणार नाही असा कडक कायदा करणार तसेच वनहक्क कायद्यातील तिन पिढ्याची अट रद्द करुन शेतकऱ्याचा हक्क कायम करणार.*बेरोजगार, युवक युवतींना लघुउद्योगाकरीता १० लाखापर्यंत बिना जामीन बिना तारण कर्ज देण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक बेरोजगार कुटुंबाला किमान १८ हजार रु.वेतन मिळेल अशी रोजगाराची हमी देण्यास,७०% च्या वर नैसर्गिक अपंगत्व असणार्या सर्व बेरोजगारांना १० हजार रुपये दरमहा मदत देवून बेरोजगारीवर १००% उपाय करुन कोणीही बेरोजगार असणार नाही याची हमी देण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे.

शिक्षण व्यवस्थेवच देशाचं भविष्य ठरत असते. तेव्हा KG ते PG पर्यंतचे सर्व शिक्षण सक्तीचे दर्जेदार व पदवीपर्यंत मोफत तथा प्रत्येक ग्रामीण भागातील अंगणवाडी सरकारी शाळांचा काॕन्हेटच्या धर्तीवर दर्जेदार इंग्रजी माध्यमातून इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेत शिपाई क्लर्क प्रत्येक विषयासाठी प्रशिक्षित तज्ञ शिक्षकांची भरती करण्यात येईल,शिक्षकांना करावी लागणारी १५० च्या वर अशैक्षणिक कामे बंद करण्यात येईल,जीवनोपयोगी वैज्ञानीक दृष्टीकोनाने परीपूर्ण असलेला अभ्यासक्रम राबविण्यात येवून जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करण्यात येईल त्यासाठी आम बजेटच्या २५% शिक्षण क्षेत्रासाठी खर्च करण्यास,सर्व विद्यार्थ्याना मोफत प्रवास पास, जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत जेवन निवासासाठी वसतीगृहाची सोय करण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध असणार.
ओबीसींसह सर्व जातीची जातीनिहाय जनगनना करुन त्यांच्याप्रमाणात सरकारी नोकरीतील भागीदारी व अनुशेष भरुन काढून आरक्षण व आम बजेटमधील वाटा मिळवून देण्याची हमी देत आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कुणावरही अन्याय न करता मराठा समाजासाठी स्थायी आरक्षणाची तरतुद करुन मराठा समाजाला त्याचे हक्क व अधिकार संभाजी ब्रिगेड मिळवून देईल.

संभाजी ब्रिगेड शिवधर्माच्या महान मानवतावादी तत्वज्ञानाच्या आधारे धार्मिक तथा जातीय दंगलींचे समुळ उच्चाटन करण्यात येईल.व जगातील सहिष्णू वा शांतीप्रिय देश म्हणून भारताची ओळख निर्माण करेल.अ दर्जाच्या सर्व धार्मिक स्थळांचे सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीयकरण करण्यात येवून त्याच्या उत्पन्नातून शिक्षण आरोग्य दारिद्रय निर्मुलन कुपोषण सारख्या लोककल्यानकारी योजना राबवून भारताला महासत्ता बणवणार.
प्रत्येक गांव स्मार्ट व्हिलेज करण्यात असेल, बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे सर्व सुविधायुक्त पक्के घर देण्यात असेल, दिल्ली च्या धर्तीवर दर्जेदार डिजीटल शाळा,प्रत्येक गावात गावालगतची सरकार जागा खरेदी करुन सार्वजनिक उद्यान,प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय, खेळासाठी क्रीडा संकुल,२४ तास विज,शुद्ध पिण्याचे पाणी,पक्के काॕक्रिट रस्ते,पक्की सांडपाण्याची व्यवस्था, प्रत्येक घरी संडास,धुरविरहीत स्वयंपाकघर असणार,
महिलांच्या सक्षमिकरण व सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजण्यात येईल.मुलींच्या शिक्षणासाठी व सर्वांगीन विकासासाठी सर्व सुविधा मोफत करण्यात येईल,सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची सोय करण्यात येईल,महिलांना आत्मसंरक्षणासाठी व आत्मनिर्भयतेकरीता प्रशिक्षण व अर्थसहाय्य देण्यात येईल,महिला बचतगटांना लघुउद्योगासाठी अल्पव्याजदरात कर्जपुरवठा करण्यात येणार
निरव्यसनी समाज हिच देशाची खरी ताकद असते.

जो निरव्यसनी तो सुखी हे निसर्गाच सुत्र आहे. तेव्हा संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात संपूर्ण देशात दारुबंदी करण्यात येवून दारुची कारखाने व दारुतस्करांना कायमस्वरुपी हद्दपार करावी यासाठी संभाजी ब्रिगेड आग्रही आहे.
आयुष्याचा शेवट हा सुखकर व्हावा यासाठी सर्व जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व वृद्धापकाळ २ हजार पेन्शन देण्यास कटीबद्ध.जातीभेद हा देशाला लागलेला कलंक आहे तो धुवून काढणे हे संभाजी ब्रिगेडचं स्वप्न आहे. या जातीभेद निर्मुलनाकरिता आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देवून नव दांपत्याला ५ लाख रु.मदत देण्यात येणार.
पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी ताडोबा सारख्या महाराष्ट्रासह देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प असलेल्या अभयारण्याला जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळे तयार करण्यात येणार,आपले ऐतिहासिक धरोवर असलेले सर्व ऐतिहासिक गड किल्ले व वास्तुंचे संवर्धन करुन पर्यटनासाठी विकसित करण्यात येईल सर्व ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे.

मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील सर्व धरण नदी तलाव सागर यासारख्या जलस्त्रोतांवर स्थानिक मच्छिमारांना मच्छिमारीचे अधिकार देण्याचा प्रयत्न असणार.
*आरोग्याच्या प्रत्येक नागरीकाला उत्तम सोयी देणे ही सरकारची जाबाबदारी असते तेव्हा “आरोग्य माझा हक्क” ही योजना तयार करुन महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक सरकारी रुग्णालयात डायलेसिस पासूनच्या सर्व सोयी मोफत पुरविणे हा प्रत्येक नागरीकाचा हक्क पूर्ण करणार.ग्रामीण जनतेच्या सेवेत कसूर न राहावा यासाठी सर्व ग्रामीण कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयी सरकारी क्वाॕर्टर बांधून देण्यात येईल विकासाच्या तथा प्रशासनाच्या दृष्टीने छोटी राज्य, जिल्हे, व तालुके निर्मितिला प्राधान्य देण्यात असेल दुर्गापूर सारखी थर्मल पावर स्टेशन्स,एम आय डि सी,कोल माइन्स,धरणांकरीता शेतकऱ्याच्या कवडीमोल किमतीत जमीनी आवंटीत केलेल्या आहे परंतु त्या उपयोगात न आणता तशाच पडून असेल तर अशा जमीनीचा फेरआढावा घेवून त्या शेतमालकाला परत करण्यात येईल.

खाजगीकरण म्हणजे देशाची सार्वभौमक्ता नष्ट करणे होय तेव्हा खाजगीकरणाला पूर्णता पायबंद घालून शाळा काॕलेजेसपासून सर्व स्रोतांचे सरकारीकरण करण्यात येईल.भ्रष्टाचार निर्मुलनासाठी कठोर कायद्याची निर्मिती करण्यात येवून सर्व भ्रष्टाचारांकडून देश विदेशातून काला धन सरकार जमा करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.देशाच्या आंतरिक तथा बाह्य सुरक्षिततेशी कसलीही तडजोड करण्यात येणार नाही.तिन्ही सेनादले जगात उच्च दर्जाची सर्व सोयींनी संपन्न करण्यात येईल.देशातील सर्व समाजउद्धारकांना,ऐतिहासिक मानवतावादी कार्य करणाऱ्या सर्व महामानव संतांना भारतरत्न देवून गौरान्वित करण्यात येणार.आदर्श मातृत्वाची उतुंग प्रेरणास्त्रोत असलेल्या राष्ट्रमाता राजमाता माॕसाहेब जिजाऊंच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे जागतीक दर्जाची सर्व सोयीसुविधायुक्त जिजाऊसृष्टी निर्माण करण्यात येईल.लोकशाहीच्या रक्षणार्थ सर्व प्रशासनिक संस्था स्वयंपूर्ण असणार,पारदर्शकतेसाठी निवडणूक प्रक्रिया बॕलेटपेपरवरच घेण्यात येवून जनतेच्या भावनेला व विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

ही सर्व १००% उद्दिष्ट पुर्ण करण्याकरीता सर्व मोठे व्यापारी उद्योगपती यांच्याकडून होणाऱ्या करचोरीवर कडक उपाय करण्यात येईल.उद्योगपतींचे डुबीत सर्व कर्ज सक्तीने वसूल करण्यात येईल व पारदर्शक कारभाराची हमी देवून संभाजी ब्रिगेड जनतेला दिलेल्या वचनाची १००% पुर्तता करण्याची हमी देत आहे.

*”जिजाऊ ब्रिगेड”*
हे एक महिलांच्या उत्थानाकरिता उभारण्यात आलेलं संघटन आहे.कोणत्याही समाजरुपी रथाची दोन चाके पुरुष आणि स्त्री असून,ही दोन्ही चाके सारखी गतीमान असेल तरच समाज वेगाने पुढे जावून प्रगती करु शकतो, हे त्रिकाल सत्ये डोळ्यापुढे ठेवून,या वर्णव्यवस्थी समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्री ला गुलाम करुन अनेक बंधनात बांधून ठेवले या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त,सुदृढ व सशक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाने स्त्रियांच संघटन “जिजाऊ ब्रिगेड” कक्ष स्थापन करुन स्त्रीयांना आपल्या गुलामगिरीची जाणीव करुन दिली.धार्मीक बंधनातून व कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाच्या माध्यमातून वैचारीक लढा उभारला आहे. स्त्रीयांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून स्त्रीसक्षमिकरणाचं कार्य मोठ्याप्रमाणात या कक्षाद्वारा सुरु आहे.
आपल्या प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक सिंधु संस्कृतीमध्ये स्री ही कुटुंबप्रमुख असायची, शेतीचा शोध लावणारी स्री होती, कुटुंबाचा कारभार स्रीच चालवत असे त्यामुळे प्रत्येक कुटुंब सुखी होते. त्यामुळेच हा देश सुखी संपन्न होता,या देशात सोन्याचा धुर निघत होता असे म्हणतात,त्या काळात या देशाला सोन्याची चिडीयाॕ असे सुद्धा म्हणत म्हणजेच हा देश जगात सुखी समृद्ध होता याच कारण मातृसत्ताक समाजरचना होती. म्हणूनच माता हे बिरुद लागलेला जगातला एकमेव देश भारत हा आहे.

परंतु आर्य वैदिकांच्या आक्रमनानंतर या देशात वर्णव्यवस्था निर्माण करुन स्रीला गुलाम केल्या गेले,अनेक बंधनात तिला बांधल्या गेले,आज तिच्या बंधनाच्या प्रतिकाने अलंकाराची जागा घेतली परंतु हे तिच्यावर लादलेली बंधने आहेत,स्रीला शुद्राचा दर्जा दिला गेला.तिच्यावर शिक्षणबंदी लादली गेली.तिला उपभोगाची वस्तु तथा चुल आणि मुल एवढ्यापुरतीच सिमीत करुन ती कधी स्वतंत्र होणारच नाही यासाठी भाकड पोथीपुराने रचून तिच्यामागे उपासतापास कर्मकांडे लादली गेली.तिथूनच या देशाच्या अधोगतीला सुरुवात झाली.स्री सक्षम असेल तरच समाज वेगाने पुढे जावून प्रगती करु शकतो, आजही ज्या घरात स्री स्वतंत्र आहे स्रीला सन्मान आहे,स्री प्रमुख आहे ते घर सुखी समृद्धच दिसेल.मातृसत्तेच हे त्रिकाल सत्ये डोळ्यापुढे ठेवून,या वर्णव्यवस्थी समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्री ला गुलाम करुन अनेक बंधनात बांधून ठेवले या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त,सुदृढ व सशक्त करण्यासाठी व तिला या शोषक धर्माच्या विळख्यातून बाहेर काढून शिवसंस्कृतितील गतवैभव शिवधर्माच्या माध्यमातून राष्ट्रमाता राजमाता माॕ.जिजाऊंना उतुंग मातृत्वाचं प्रेरणास्थान मानून स्रीयांना गतवैभव मिळवून दिल.मातृशक्तीच या देशाला महासत्ता बणवू शकते या विश्वासाने मराठा सेवा संघाने स्त्रियांच संघटन “जिजाऊ ब्रिगेड” कक्ष स्थापन करुन स्त्रीयांना आपल्या गुलामगिरीची जाणीव तथा धार्मीक बंधनातून व कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाच्या माध्यमातून वैचारीक लढा उभारला.स्त्रीयांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून स्त्रीसक्षमिकरणाचं कार्य मोठ्याप्रमाणात या कक्षाद्वारा सुरु आहे.

विश्वाची अर्धी शक्ती ही स्री शक्ती असून या शक्तीला जगातल्या एकाही धर्माने अग्रस्थान सन्मान दिलेला नव्हता. उलट स्री शक्तीला काही धर्मांध्यांनी वाळीत टाकले होते.परंतु मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवधर्माच्या प्रकटनाने आपल्या प्राचीन मातृसत्ताक बळीसिंधुशिव संस्कृतीचं पुनर्जीवन करुन विश्वातला असा एकमेव असलेला शिवधर्म की ज्यात मातृसत्तेचं प्रतिक जिजाऊंच्या रुपाने विश्वाची जननी स्री हेच आपलं प्रेरणास्थान माणून माहिलांना सर्वाधिकार व अग्रस्थान देणारा जगातला पहिला धर्म “शिवधर्म” ठरला आहे.आज शिवधर्मानुसार महिला आचरण करित असून त्यांनी आपल्या घरातून या शोषक पुरोहितांना हद्दपार केले आहे. प्रत्येक संस्कारामध्ये पुरोहिताची भुमिका महिला स्वतः पार पाडत असून धार्मिक गुलामीतून स्री मुक्त झाली आहे. जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातुन घराघरात शिवधर्माच आचरण व्हाव यासाठी प्रयत्न होत आहे.

*”डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद”(PDRSP)*
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या व देशाचा आधारस्तंभ असलेली सक्षम भावी पिढी घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांच संघटन.
हा कक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून या कक्षाच्या माध्यमातून, शिक्षकच खर्या अर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याच कार्य करीत असतो त्यामुळे भारताचं महासत्ता होण्याच स्वप्न शिक्षकच पूर्ण करु शकतो यावर मराठा सेवा संघाचा विश्वास आहे,त्यासाठी विवेकशील विज्ञानवादी पिढी तयार करणे आवश्यक आहे तरच हे स्वप्न पूर्ण होवू शकते, हे कार्य शिक्षकाच्याच हातून घडू शकते त्यादृष्टीने डॉ.प.दे.रा.शि.प.कार्य करत आहे,फक्त शिक्षकांच्या भौतिक समस्या सोडविने एवढ्यापूरतेच मर्यादित काम या कक्षाचे नसून शासनाला शैक्षणिक गुणवत्ता,अभ्यासक्रम निश्चीतीत दिशानिर्देश देणे,देशाच्या धर्मनिरपेक्षतेला एकात्मतेला व बंधुभावाला बाधा येईल अशा अभ्यासक्रमातील घटकावर आक्षेप नोंदवून शासनाच्या निदर्शनास आणून समाजजागृती करने.अभ्यासक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोन,अंधश्रद्धानिर्मुलन या मुल्याच्या जपनुकीसाठी पाठ्यक्रम मंडळावर नियंत्रण ठेवणे त्याच प्रमाणे शिक्षणक्षेत्रावर जास्तीत जास्त आम बजेटमध्ये तरतुदीसाठी आग्रही असने आदी कार्य या कक्षाच्या माध्यमातुन होत असून शासनाला वेळोवेळी बाध्ये केले आहे.त्यामुळे या संघटनेकडे शासन एक मार्गदर्शक शिक्षक संघटना म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते.*राजर्षी शाहु शिक्षण परिषद* शिक्षण तज्ञांचं संघटन.समाजाच्या प्रगतीला पोषक असे शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यास करुन त्याप्रामाने शासनास मार्गदर्शन करण्याचे,चुकिच्या धोरणाला विरोध करुन त्याचे होणारे दुष्पपरिणाम सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम हा कक्ष करीत आहे.

*”वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद” (VBVP)* देशाचा भावी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांचं संघटन.
विद्यार्थी हा देशाचा भावी नागरीक असून संविधानाने या देशाच भवितव्य प्रत्येक नागरीकाच्या हाती सोपविले आहे,या देशाचा नागरीकच या देशाचा चालक आणि मालक संविधानाने बनवला आहे.अशा या भावी नागरीकाची जडनघडन विद्यार्थीदशेतच होत असते,विद्यार्थी दशेतला हा काळ त्याच्या भावी आयुष्याचा संवेदनशिल काळ असतो तेव्हा त्याला योग्य दिशा मिळून स्वयंपूर्ण एक जबाबदार, आपल्या देशाच्या संविधानावर निष्ठा ठेवणारा,आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर निष्ठा बाळगणारा,अंधश्रद्धेला मुठमाती देणारा, विज्ञाननिष्ठ उद्दोगशील भावी नागरीक निर्माण व्हावा याकरीता शिक्षण संस्था, बोर्ड, विद्यापीठ,अभ्यासक्रम,पाठ्यक्रम विद्यार्थांच्या समस्यांवर अंकुश ठेवण्याचे काम वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (VBVP) करत आहे.
*”कृषिरत्न विखे पाटील कृषी कक्ष* देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचं संघटन.
भारत हा कृषीप्रधान देश, आपली मुळ बळीराजापासूनची सिंधुजनांची संमृद्ध अशी कृषी संस्कृती परंतु आर्यांच्या आक्रमनानंतर सोन्याचा धूर निघणार्या या महान वैभवशाली सिंधु संस्कृतिचा र्हास झाला, वैदिकांच्या यज्ञ संस्कृतिचा विरोध करणार्या बळीराजाला वामनान पाताळात गाडलं म्हणजे कपटानं खुन केला ते आजतागायत सुरु आहे,आजही गळफास घेवून या देशाचा पोषिंदा असलेला बळीराजा आपले जीवन संपवत आहे.ही वस्तुस्थिती असून ती बदलवण्यासाठी, शेतकर्यांच्या व्यथांना शासनदरबारी वाचा फोडण्याचे काम या कक्षाद्वारा केले जात आहे.शेतं तिथं मुबलक पाणी,पिकाला हमी भाव,स्वामीनाथन आयोगाची अम्मलबजावणी,शेतमालासाठी जागतीक बाजारपेठ खुली करण्यासाठी आंदोलन,कच्च्या शेतमालावरील पक्क्या मालाच्या प्रक्रीया लघुउद्दोगाला उत्तेजन व अर्थसहाय्य कारण्यासाठी पाठपुरावा शेतकर्याचे पाच रुपये किलोने टमाटर घेवून त्या एक किलो टमाटरपासून पाचशे रुपयाचा सॉस बणवून उद्दोगपती विकतो. ही शेतकर्याची पिळवणूक थाबविण्यासाठी,पारंपारीक शेती ऐवजी आधुनिक व्यापारी शेतीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या कक्षाद्वारे केले जात आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड न्यायदान कक्ष’*
संविधानाचा सन्मान राखून न्यायव्यवस्था बळकट करणाऱ्या वकिलांचं संघटन.या देशात धार्मिक उन्माद फार वाढला आहे.बेरोजगारी वाढवून येथील तरुनांना निराशेच्या आणि दारिद्र्याच्या खाईत लोटले आहे. जेनेकरुन अशा नैराश्य आलेल्या दिशाहिन तरुनांची धर्माचे ठेकेदार फौज तयार करुन त्यांच्या हातून धर्माच्या नावावर विध्वंसक कृत्ये सहज करवून घेतल्या जातात व नंतर त्याना वार्यावर सोडून दिल्या जाते (use & throw).चुकिचा इतिहास त्यांच्यापुढे मांडून समाजात त्यांच्याकडून कलह निर्माण केल्या जाते, अशा तरुणांचे आयुष्य बरबाद केल्या जाते,त्यांचे मास्टरमाइंड पुराव्या अभावी किंवा शासनाच्या उदासिनतेमुळे मोकाट फिरतात, अशांच्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून मुस्क्या आवळण्याचे काम, अन्याय अत्याचारा विरोधात तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी एक वकिलांच संघटन न्यायदान कक्षाच्या रुपाने कार्य करत आहे.
*संगीतसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद* आपला खरा वैभवशाली सांस्कृतिक वारसा कलेच्या माध्यमातून जपणाऱ्या कलाकारांच संघटन.मानवी जीवनात कलेला फार अनन्यसाधारन महत्व आहे, कलेमुळेच मानवी जीवनाला सौदर्य प्राप्त झाले आहे.कलेच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट मानवी मनावर लवकर बिंबवल्या जावू शकते,रशियन जनतेला आपली मराठी हिंदी भाषा कळत नव्हती तरी अन्नाभाऊ साठेंनी आपल्या शाहीरी व पोवाड्याच्या माध्यमातून छ.शिवरायांना रशियासारख्या विदेशी धर्तीवर पोहचविले,एवढी ताकत एखाद्या कलेत असते चित्रकलेच्या, नाटकाच्या ,लघुपट,चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या प्राचीन संस्कृतिचे प्रभावी दर्शन घडवू शकतो, परंतु या क्षेत्रावर उच्चवर्णीयांचाच प्रभाव असल्याने आपल्यापुढे चुकिचे कथानक नाटके चित्रे इत्यादिंच्या माध्यमातून चुकिचा इतिहास रंगवून आपली दिशाभुल करुन शोषन केले.

त्यांनी मात्र आपल्या स्वत:च्या मुलींना अभिनेत्री,अँटमगर्ल सारख्या सोज्वळ नावाने अंगप्रदर्शन करुन अमाप पैसा कमवला परंतु बहुजनांच्या मुलींनी साधा सलवार नेसला टिकली लावली नसेल तर आम्ही यांची संस्कृति बाटवत होतो,धर्म बुडवत होतो.म्हणून आता या कक्षाच्या माध्यमातून आपल्या बहुजनांच्या मुलांना या क्षेत्रात संधी मिळावी,त्यांच्या कलागुणांना वाव मिळून चांगले कलावंत निर्माण व्हावे,त्यांनी फार मोठी प्रगती करुन आर्थीक संपन्न बणावे व आपल्या कलेद्वारा आपला खरा जाज्वल सत्ये इतिहास समाजापुढे मांडून समाज जागृती करुन समाज ऋण फेडण्याचे कार्य हा कक्ष करत आहे.

*जगद्गुरु तुकोबाराय साहित्ये परिषद कक्ष*
आपल्या महान संतांचे विचार व त्यांच्या साहित्याचा प्रसार करणाऱ्या प्रचारकांचं संघटन.या देशात आर्यांच्या आक्रमनानंतर सिंधु संस्कतीचा र्हास करण्यात आला या देशात तक्षशिला, नालंदा…. सारखी जगप्रसिद्ध अशी विश्वविद्यापीठे होती जगातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत एवढी समृद्ध शिक्षण व्यवस्था या देशात होती त्यामुळेच आपला देश सिंधुसंस्कृतित सुखी समृद्ध होता म्हणूनच तर भारताला सोन्याची चिडीयॉ म्हणत परंतु या विदेशी आर्यवैदिकांनी ही विश्वविद्यालये व ग्रंथ भांडार जाळून खाक केले,पुढे वर्णव्यवस्था निर्माण करुन सिंधुजनांना शिक्षणबंदी करुन आर्यवैदिक यांनी शिक्षण क्षेत्र आपल्या ताब्यात घेवून त्यांनी आपल्या सोईनुसार साहित्ये निर्मिती केली,अनेक कलोकल्पित पोथ्या पुराने लिहून आपला सिंधुजनांचा समृद्ध वारसा दुषित केला.आज आपल्या समृद्ध वारशाच्या सत्ये इतिहासाचे संशोधन व लेखन करने,खरा इतिहास आपल्या समाजापर्येंत पोहचवने,महापुरुषांचे,संतांचे विचार साहित्याचा प्रचार व प्रसार करने,स्वत:च साहित्ये निर्माण करने,प्राचीन साहित्याचा चिकित्सक अभ्यास करुन समाजापुढे विश्लेषक मांडणी करने,नवोदितांना साहित्ये निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य जगदगुरु तुकोबाराय साहित्ये परिषद या कक्षाद्वारे अविरत सुरु आहे.

*मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शक कक्ष* तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन सक्षम उद्योजक तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेलं उद्योजकांच संघटन.
उद्योगी तरुण हा आपल्या कुटुंबाचं समाजाचं पर्यायाने देशाचं भविष्य बदलवू शकते वर्तमान स्थिती बघता सरकारी नोकर्या जवळ जवळ दुरापास्त झाल्या आहे,बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे,हाताला काम नसेल तरं ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ या म्हणी प्रमाणे आपल्या जीवनात नैराश्य निर्माण होवून आपण अलगत विघातक शक्तीच्या जाळ्यात अडकून तरुण मुलं आपले आयुष्य बरबाद करुन घेते, तेव्हा तरुनांच्या हाताला काम मिळावे,त्याला छोटामोटा उद्योग करुन सुखी जीवन जगता यावं यासाठी यशस्वी उद्योजकांचं एक संघटन उभं करुन त्याद्वारा वेगवेगळ्या उद्योगांबद्धल माहिती,प्रशिक्षण,अर्थसहाय्य,रोजगार मिळवून देण्यास मदत करने व उद्योगी तरुण निर्माण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवून या कक्षाची निर्मिती करण्यात आली असून त्याप्रमाने वाटचाल सुरु आहे.

*वर वधु सुचक कक्ष* आदर्श नवदांपत्याची रेशीमगाठ बांधून देण्यास सहाय्य करणारं संघटन.
मातृसत्ताक संस्कृती नष्ट केल्या गेल्यानंतर स्त्री ही फक्त उपभोगी वस्तु म्हणून या वर्णव्यवस्थेत स्त्रीला स्थान देण्यात येवून हीन वागणूक देण्यात आली.लग्न म्हणजे स्त्रीचा बोझ असून त्याबदल्यात तिच्या मातापित्याकडून भरपाई म्हणून हुंडा घेण्याची वाईट प्रथा या वर्णव्यवस्थेत सुरु झाली.याचा परिणाम अनेक मुली हुंडाबळीच्या शिकार होत आहे,मुलीचे वडिल कर्जबाजारी होवून आत्महत्या करत आहे,अशा परिस्थितून समाजाला जागृत करण्याचं काम बिना हुंड्याने फक्त एक रुपयात मराठा वधु वर कक्ष शिवविवाह मेळावे घेवून बिना खर्चाने शेकडो हजारो विवाह या कक्षाच्या माध्यमातून आजपावेतो पार पडत आले आहे.*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष* व्यसनमुक्त निरोगी समाज घडवणाऱ्या समाजसेवकांचं संघटन.युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी भारतात सुख समृद्धी शांती नांदावी,देशाचं कल्याण व्हावं यासाठी मराठा सेवा संघाची महान पुरोगामी चळवळ उभी केली. या चळवळीला गती देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आपापल्या क्षेत्रात या चळवळीचं काम जोमाने पुढे न्याव या दृष्टीने ३३ कक्ष निर्माण केले. या कक्षांद्वारे देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे.त्यातला एक कक्ष “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष”.

निरोगी निरव्यसनी सुदृढ बलशाली समाजच कोणत्याही देशाची धरोवर असते. मादक पदार्थाचे व्यसन हे मानसाला शारीरिक मानसिक व आर्थिक दुर्बल बणविते,व्यसन हेच मानसाच्या अधोगतीचे दारिद्रयाचे कारण आहे. ज्या देशाचा नागरिक दुर्बल तो देश दुर्बल.या देशाला बलशाही बणविण्यासाठी या देशाचा युवक हा निर्व्यसनी असवा यासाठी राष्ट्रसंतांनी आदर्श मानवी जीवनाच्या संहितेच ग्रामगीतेच्या रुपाने आपल्या जीवनाचं संविधानच जनू राष्ट्रसंतांनी आपल्याला उपलब्ध करुन दिल.त्यांनी भजनांच्या माध्यमातुन समाजाला व्यसनंमुक्त करण्यासाठी मार्मिक भजने लिहीली व स्वतः गावून समाजाला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.परंतु आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.शाळकरी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू गुटखा बिडी सिगारेट दारु चरस भांग गांज्या….आदी मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.शासन प्रशासन वर वर व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम राबवित असल्याचे भासवते परंतु मुळात मादक पदार्थाचे स्रोत मात्र कायमस्वरुपी बंद करत नाही.कारण सरकारला जनतेच्या आरोग्याची नाही तर महसुलाची चिंता आहे.

यामुळेच व्यसनाचे प्रमाण वाढत असून दारिद्रयात अनारोग्यात वाढ झाली असून देशाचं भवितव्य धोक्यात आलं आहे. आमचा विश्वास आहे की दहा वर्ष रस्ते नाही बणले विकासाची कामे नाही झाली तरी चालेलं परंतु सरकारने ही अम्ली पदार्थाची दारुची कारखाने बंद केली,या सर्व अम्ली पदार्थाच्या स्त्रोतांवर कडक अंकूश बसवला तर प्रत्येक घर सुखी होईल पर्यायाने देश सुखी होईल.”निर्व्यसनी समाज सुखी समाज” हे राष्ट्रसंतांच अधुरं राहिलेलं स्वप्न मराठा सेवा संघ प्रणित “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसन मुक्ती कक्षाद्वारा” व्यसनमुक्ती शिबिरे,पथनाट्यासारखे कार्यक्रम आयोजीत करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच काम राष्ट्रीयस्तरावर सुरु आहे.
*संत नामदेव तुकाराम वारकरी परीषद.* संताचे विचार घराघरात पोहचवून अंधश्रद्धा पाखंडातून समाजाला नवी दिशा देणाऱ्या वारकऱ्यांचं संघटन.

सिंधुजन बहुजनांना वैदिकांच्या पाखंडी दैववादी कर्मकांडातून अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगीरीतून समाजाला मुक्त करण्यासाठी आपल्या अभंगरुपी साहित्यातून या वैदिकांच्या शोषणावर घनाघाती वार केले हे वार या वैदीकांना एवढे असह्य झाले की तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडवून संत तुकारामांचाही खुन करुन पुष्पक विमानाने वैकुंठाला गेल्याची आरोळी ठोकावी लागली.एवढं प्रभावी शस्त्र संत नामदेवांनी व तुकारामानी आपल्या जीवनाच्या कल्यानासाठी दिलं परंतु अजूनही त्या अभंग रुपी गाथेचा आपल्या कल्यानासाठी आपण उपयोग करुन घेवू शकलो नाही तेव्हा त्यांच्या महान साहित्याचा व विचारांच्या जानकारांचं संघटन संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद या कक्षाद्वारे त्यांच अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.*सहकार कक्ष* आज सहकार नसेल तर उद्धार संभव नाही.एकीच बळ हे सर्वज्ञात आहे.याच तत्वा नुसार सहकारी तत्वावर मराठा सेवा संघाद्वारा सहकार कक्ष स्थापण करण्यात आला.

या कक्षाद्वारा प्रत्येक जिल्ह्यात जाजाऊ सहकारी पतसंस्था स्थापण करण्यात येवून त्याद्वारा सभासदांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास सक्षम केल्या जाते.
*संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष* समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा अंधश्रद्धा दुर करण्यासाठी समाजाला प्रबोधित करणारांचं संघटन.आपल्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्येपूर्ण कलेने वकृत्व शाहीरी काव्य किर्तन भजन आदी कला गुणांनी पारंगत असलेल्यांचं संघटन समाजात प्रबोधन करुन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात हा कक्ष कार्यरत असून आधुनिक समाज घडणीसाठी मोलाचे योगदान देत आहे.*मराठा मार्ग कक्ष* नवोदित विचारवंतांच्या विचाराचा प्रसार प्रचार करण्यासाठी साप्ताहिक मासिके चालवून मानवी जीवनावर प्रकाश टाकणारे विचार घराघरात पोहचविणाऱ्या लेखक साहित्यिकांचं संघटन.
याद्वारा मराठा मार्ग सारखे मासिक दिनदर्शिका नवोदित लेखकांचे साहित्ये प्राकाशित कराण्याचे काम हा कक्ष अविरत करीत आहे.

*इतिहास कक्ष* संशोधक नवोदित इतिहासकारांच संघटन.
इतिहासातूनच भविष्याचा मार्ग निघत असतो.आपला इतिहासच जर चुकिचा असेल तर आपण चुकिच्या मार्गाने जाणार.या देशात शिक्षणसत्ता विशिष्ट वर्गाच्याच हाती असल्याने या देशातील बहुजन उद्धारकांचा इतिहास त्यांनी त्यांच्या सोईनुसार अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिहील्या गेला.या देशाचा खरा इतिहास मिटवून कलोकल्पीत आभासी व इतिहासाचे विकृतिकरण करुन अंधश्रद्धेला खतपाणी देणारा इतिहास लिहीला गेल्याने आपल्या महापुरुषांचं कर्तुत्व स्वतःच्या नावाने करुन किंवा ते दैववादी ठरवून मिटविल्या गेले.त्यामुळे अनेक बहुजन महामानवांचे खरे कार्य समाजापर्यंत पोहचले नाही. तेव्हा इतिहास कक्ष हा या इतिहासाचा संशोधनात्मक व चिकित्सक अभ्यास करुन खरा इतिहास समाजापुढे मांडण्याचं काम करत आहे.

*डाॕ.रुखमाबाई राऊत आरोग्य कक्ष*
मन मनगट आणि मेंदु हे तीन ‘म’ ज्या मानसाचे सशक्त आणि सुदृढ असेल तोच मानुस आपल्या जीवनात क्रांती किंवा प्रगती करु शकते.यासाठी निरोगी शरीर हेच खरं धन आहे.बहुजन समाजाचं स्वास्थ जपण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डाॕक्टरांच संघटन भारताच्या पहिल्या महिला डाॕक्टर डाॕ.रुखमाबाई राऊत यांच्या नावाने हा कक्ष कार्य करत आहे.
*तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष* प्रामाणिक पत्रकारांचं संघटन.
निर्भय निरपेक्ष पत्रकारीता म्हणजे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आज भारतीय लोकशाहीचे संसद,प्रशासन,न्यायपालिका,व मिडीया चारही स्तंभ कमजोर आणि खिळखिळे झाल्याचे जानवत आहे.इव्हीएम वर प्रश्नचिन्ह?प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह?न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह?पत्रकारीतेवर प्रश्नचिन्ह? यावरुन ह्या चारही स्तंभाला सत्ता आणि पैसा याचा जंग लागला असून ही लोकशाहीची इमारत कोसळते की काय?असी भिती निर्माण झाली आहे.या चारही स्तंभाने सत्तेपुढे घुटने टेकल्याची जाणीव प्रत्येक सुज्ञ नागरिकाला होत आहे.चौथा स्तंभ मिडीया अतिशय महत्त्वाचा आहे कारण इतर तिन्ही स्तंभावर याचा प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाने मिडिया प्रिंट असो की इलेक्ट्रॉनीक असो विशेष म्हणजे समाजमनावर गहरा प्रभाव पाडत असतो त्यामुळे या स्तंभाची जबाबदारी देशामध्ये शांतता सहिष्णुतता प्रेम बंधुभाव ही मुल्य जपण्याचे काम मिडीया याच स्तंभावर आहे. या मुल्यावरच लोकशाही उभी आहे.जर का मिडीया धर्म जात पंथ पक्ष निरपेक्ष नसेल तर या मुल्यांना तडा जावून देशाची काय परिस्थिती होईल याची कल्पना करणेच कठीण.तिच भिती आजची परिस्थिती बघता वाटते.भर दिल्ली दरबारात संविधानाला जाळणार्या शक्ती संविधान बदलविण्याची भाषा करतांना दिसते, प्रत्येक घटनेत धर्मांधशक्ती धार्मिक द्वेषाचे जहर पेरतांना दिसते,ज्या महापुरुषांनी या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बलिदान दिले त्यांच्या खुनाची तहान अजुनही भागली नसनारे त्यांच्या प्रतिमांवर गोळ्या झाडतांना दिसतात.साधुच्या वेषातले आतंकवादी शस्त्र प्रदर्शन करतांना दिसतात. तेव्हा या देशाचे भविष्य धोकादायक अंधकाराच्या गडद छायेत दिसायला लागते.

परंतु या निराशेच्या छायेतही नितीमुल्यांनी परिपुर्ण एखादा पत्रकार बघून कुठतरी आशेचा किरण दिसतो परंतु या किरणाचा प्रवास किती खडतर असतो हे सुद्धा समजून घेण्यासाठी भक्तांनी भक्ती त्यागून निरपेक्ष समजून घेणे तेवढेच महत्वाचे असते.आज मिडीयावर मनुवाद्यांची मालकी व कब्जा असल्याने अशा निर्भिड सच्च्या पत्रकारांना कशाप्रकारे वाळीत टाकल्या जाते याचा प्रत्येय येतो प्रसारमाध्यम विसरेल परंतु सुज्ञ जनता मात्र त्यांचे कार्य कधिच विसरणार नाही.जेव्हा जेव्हा पत्रकारीयतेचा विषय येईल तेव्हा तेव्हा अशा पत्रकारांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कोणतेही राजकीय विश्लेषन असो,कोणतीही घटना असो तिचे अभ्यासपूर्ण सटीक असे निर्भय निरपेक्ष विवेचन करुन सत्य हकिगत जनमानसापर्यंत पोहचवणा पत्रकार फारच दुर्मिळ असते कारण हे कार्य पार पाडत असतांना त्याच्यापुढे संकटांचा पहाड उभा असतो परंतु असे पत्रकार कसल्याच संकटाला भिक घालत नसते. अशा निर्भिड पत्रकारांचं संघटन असने काळाची गरज आहे.हे पूर्ण करण्याचे स्वप्न तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष करीत आहे.

प्रसार प्रचार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जातो.हा स्तंभ जर भ्रष्टाचाराने पोखरला तर लोकशाही डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे सामाजिक आर्थिक राजकिय क्षेत्रात तटस्थपणे भुमिका बजावणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांची लोकशाही वाचविण्यासाठी देशाला गरज आहे.अशा लोकशाही मुल्याचं संवर्धन करण्याच का तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष करीत आहे.
*विद्यार्थी दत्तक कक्ष* सेवाभावी उदार लोकांचं संघटन.
देशाचा पाया हा आदर्श नागरीक आहे. आदर्श नागरीकाचा पाया विद्यार्थी दशेत रचल्या जातो.त्यासाठी समाजाच्या तळागात शिक्षण पोहचने गरजेचे आहे.गरीब होतकरु मुलांला त्याच्या शिक्षणासाठी सहाय्य करणाऱ्या उदार अंतःकरण असणाऱ्या लोकांची समाजाला गरज आहे.त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.शहरांमध्ये मोठमोठे निवासी बंगले खाली पडलेले आहे.त्यात राहायसाठी परिवार नाही.तिथे फक्त कुत्रा आणि चौकीदार निवास करते असे बंगले ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब मुलांना तात्पुरती निशुल्क निवासी सोय करुन देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या या कक्षाच्या माध्यमातून आव्हान केले त्यात बऱ्यापैकी यश मिळत आहे.
*विश्व शाहीर परिषद* शाहीर कलाकारांच संघटन.
शाहीरी हे लोककलेच उत्तम असं जनजागृतीच साधन आहे. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी छ.शिवरायांना आपल्या शाहीरीद्वारा रशियापर्यंत जगात पोहचविले.या कक्षाद्वारा समाजजागृतीचं काम प्रभावीपणे करण्यात येत आहे.
*समेट कक्ष*
मानवी जीवन हे संघर्षमय आहे.आयुष्याच्या अनेक टप्यावर अनेक कारणांनी एक दुसऱ्या सोबत मतभेद होवून सबंध तानल्या जाते त्यातुनच दुरावा निर्माण होवून मानुस मानसापासून तुटत असतो.अशा वेळेस त्यांचे सबंध पुर्ववत करण्यास सामंजस्य घडवून आणण्याच काम समेट कक्ष करीत आहे.
अशाप्रकारे मंत्रालय कामकाज कक्ष,डॉक्टरांचं संघटन आरोग्य कक्ष,अभियंत्याचे संघटन,खेळाडूंचे संघटन,अधिकार्यांचं संघटनं,शिवराज्य पक्षाच्या माध्यमातून राजकिय पदाधिकार्यांचे संघटन…इ.आपापल्या कक्षाद्वारा समाजोद्धाराचे कार्य करत आहे.लेखप्रपंच वाढत असल्यामुळे विस्ताराने न घेता थोडक्या मांडण्याचा प्रयत्न करीत आहो.
*”शिवधर्माचे प्रकटन विश्वातील महान क्रांतीकारक घटना”* शिवधर्म संसद.
मराठा सेवा संघाद्वारा या देशातल्या ८५ टक्के सिंधुजनांना शिवधर्माच्या रुपाने आपल्या अती प्राचीन वैभवशाली मातृसत्ताक सिंधु संस्कृतिचा वारसा परत मिळवून दिला ही फार मोठी उपलब्धी आहे.
मानवी जीवनामध्ये धर्म ही मुलभूत गरज नसली तरी धर्माचे स्थान संवेदनशील बणविले गेले आहे,धर्मरक्षणाच्या नावावर माणूस वाट्टेल ते करण्यास वेळप्रसंगी प्राणही देण्यास एका पायावर तयार होतो.एवढा नाजुक आणि संवेदनशील विषय हाताळतांना ‘शिवधर्म गाथेच्या रुपाने इतर धर्माला कसलाही धक्का न लावता सखोल अभ्यासांती सर्व विवेकवादी पुरोगामी सिंधुजनांना आपल्या खर्या धर्माचा व संस्कृतिचा परिचय करुन दिला.
कोणत्याही धर्माला धर्मसंस्थापकाचे व धर्मग्रंथाचे एक अधिष्ठान असते.जगामध्ये जे जे प्रचलीत धर्म आहे त्यांचा संस्थापक किंवा उपदेशक व आचरणाचा एक विशिष्ट धर्मग्रंथ आहे. त्यामुळेच जागतीक पातळीवर अशा धर्मांची नोंद होवून मान्यता मिळली व प्रसार प्रचार झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातील प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणात त्या त्या देशातल्या स्थानिकांमध्ये बौद्ध, मुस्लीम, ख्रिच्चन धर्म पाहवयास मिळतो परंतु हिंदु हा धर्म भारताऐवजी जगात इतरत्र जगातल्या प्राचीन अखंड भारत वगळता इतर देशाच्या स्थानिकांमध्ये दिसत नाही इतर देशात कोणी हिंदू असेलही तरी तो भारतातून गेलेलाच असेल, यावरुन स्पष्ट होते की हिंदु या धर्माला जागतीक मान्यता नाही कारण या धर्माचा विशिष्ट धर्मग्रंथ किंवा संस्थापक नाही त्यामुळे या धर्माचा जगात प्रचार व प्रसार होवू शकला नाही. त्यामुळे हिंदु हा धर्म नसून ती एक संस्कृती, जीवनप्रणाली असल्याचे सर्वोच्च न्यायालय तथा अनेक विद्वानांनी स्पष्ट केले आहे.आपली ही जीवनप्रणाली महान निसर्गपुजक सिंधु संस्कृती असून ही संस्कृति म्हणजे बळीवंशापासून चालत आलेला शिवाचा खरा शिवधर्म आहे, कालांतराने अपभ्रवंशाने किंवा कोणाच्या हिन दुसने देण्यावरुन सिंधु चे हिंदु असे प्रचलन झाले! पुढे आर्यवैदीकांनी या महान संस्कृतीवर आक्रमन करुन होम, हवन, बली, यज्ञासारखी अंधश्रद्धेची कर्मकांड घुसडवून ही संस्कृती विदृप केली याला विरोध करणार्यां आपल्या महापुरुषांचे कपटाने खुन केल्या गेले,त्याच्यावर काल्पनीक कथा रचून कपोकल्पित साहित्ये तयार केले गेले व त्याद्वारे आपल्याला मानसिक गुलाम करुन श्रद्धेच्या, आस्थेच्या नावावर आपली लुट सुरु केली आम्ही आमच्या घामाचा, कष्टाचा मेहणतीचा पैसा पोटाला चिमटा मारुन मंदिराच्या दानपेट्यात दान म्हणून भरत गेलो आणि त्यावर हा तीन टक्के शोषक वर्ग शक्तीशाली बनून आपल्यावर राज करत आहे आजतागायत आपण त्यांच्या शोषणाचे बळी ठरत आहो.
मराठा सेवा संघाने सखोल प्राचीन साहित्याच्या चिकित्सक अभ्यासाअंती या आपल्या पुरातन शिवधर्माचे पुनरुज्जीवन करुन जिजाऊ जन्मोत्सव दिनी १२ जानेवारी २००५ ला मातृसत्तेचं मॉ.जिजाऊ हे प्रतिक डोळ्यासमोर ठेवून मातृतिर्थ सिंधखेडराजा येथे शिवधर्माचे प्रकटन केले व या देशातील सर्व सिंधुजनांना शिवधर्म संसदेने आपला ऐतिहासिक शिवधर्माचा खरा वारसा “शिवधर्म गाथे”च्या रुपाने आचरणासाठी उपलब्ध करुन दिला व त्याप्रमाने आज बहुसंख्य सिंधुजनांनी आचरन करणे सुरु केले आहे. ही विश्वातली महान क्रांतीकारक घटना आहे.
*मराठा सेवा संघ या महान पुरोगामी चळवळीने आम्हाला दिलेल्या प्रमुख दहा गोष्टी……….*
१) आम्हावर कधीच जादु टोना भुतप्रेताचा असर होणार नाही असं आमच्या शरीरातल्या मेंदुच लसीकरण करुन वैज्ञानिक दृष्टीकोन आमच्यात रुजवला.
२) आम्ही कधीच बंदुकीच्या गोळीने मरणार नाही असी वैचारिक लस देवून आमचं मन मनगट मेंदु सशक्त बणवलं.
३) शोषकांचे अदृष्य कपट कारस्थान स्पष्टपणे दिसण्याची व्यापक दृष्टी आम्हाला दिली.
४) दैववाद अंधश्रद्धा कर्मकांड यासारख्या मानसिक गुलामीच्या कैदेतून आमची सुटका करुन भयमुक्त मानवतावादी स्वातंत्र्याचा आनंद मिळवून दिला.
५) जीवन-मरणाच्या फेऱ्यातुन मुक्त करुन जेवढ आयुष्य आहे त्यात मानुसकीचं आदर्श जीवन जगण्याची उमंग दिली.
६) हातातले दगड धोंडे तलवार भाले बिचवे बारुत बंदुक काढून त्याऐवजी सर्वांवर मात करणारं पुस्तकरुपी लेखणीरुपी शस्त्र आमच्या हातात दिलं.
७) दुसऱ्याचं ऐकून वाचून खरं काय? खोट काय? याची चिकित्सा करुन स्वतःच साहित्य निर्माण करण्याची धमक आमच्यात निर्माण केली.
८) आमच्या घरातील कपाट भांडीकुंडी कपडेलत्ते व शोभेच्या वस्तुंनी भरले होते परंतु आज आमच्या घरातली कपाट पुस्तकांनी भरण्याचं काम मराठा सेवा संघाने केल.
९) जात धर्म पंथ पक्ष या पुढे जावून मानव आणि मानवता हाच खरा धर्म असा व्यापक दृष्टीकोन देवून देशाला धार्मिक व जातीय विद्वेषापासून रोखले शांती व सौहार्द प्रस्थापित करण्याचे फार मोठे कार्य आमच्या हातुन केले.
१०) आमच्या हिंदु धर्माचं शुद्धीकरण करुन खर्या महान प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक सिंधु शिवसंस्कृतिचे शिवधर्माच्या माध्यमातून प्रकटन करुन आमच्या खर्या इतिहासाची जाणीव करुन दिली. धार्मिक गुलामगीरीतून मुक्त करुन आदर्श जीवनाच्या आचरणासाठी आपला सिंधुजनांचा खरा धर्म “शिवधर्म” दिला.आज शिवधर्माचे आचरण सुमारे दोन कोटी लोक आपल्या जीवनात अंगीकारत आहे. गरीबातला गरीब मानुस वर्षभरात कमीत कमी अनाठाई पंधरा हजार रुपये कर्मकांडावर खर्च करतो आज आपण दोन कोटी लोकांचे कमीत कमी तीस हजार कोटी शिवधर्माच्या माध्यमातून कर्मकांडावर होणारा लोकांचा खर्च शिवधर्माच्या आचरणाने वाचवला आहे.
मराठा सेवा संघाची ही क्रांतीकारक पुरोगामी चळवळ ३३ कक्षाच्या माध्यमातून देशाच्या एकतेला,अखंडतेला, धर्मनिरपेक्षतेला,बंधुभावाला, सहिष्णूतेला बाधा पोहचवणार्या शक्तींवर अंकूश ठेवून देशसेवेचे महान कार्य करत आहे.
*मराठा सेवा संघाची उपलब्धी*
१,मराठा सेवा संघाच्या वैचारिक क्रांतीमुळे धार्मिक जातीय दंगलीत कमालीची घट होवून देशात सामाजिक संवार्ध राखण्यात यश.
२,मराठा सेवा संघाने सत्य इतिहास समाजापर्यंत पोहचविल्याने अंधश्रद्धा दूर करुन समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यात यश.
३,शिक्षणाचं महत्व घराघरात पोहचवून घर तिथ वाचनालय, घराघरात पुस्तकांची कपाटं निर्माण करुन शस्त्र दगड धोडे ऐवजी हातात पेन देवून मोठ्या प्रमाणात प्रशासकिय अधिकारी उद्योजक साहित्यिक आदर्श नागरीक निर्माण करण्यात यश.
४,रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी मार्गदर्शन शिबीरे तथा गरीब बहुजनांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह व अभ्यासिकेची सोय उपलब्ध करुन दिली.
५,मातृतिर्थ सिंधखेडराजा येथे भव्य सर्व सामाजिक दायित्वाच्या सुविधायुक्त जिजाऊ सृष्टी प्रकल्प निर्माणाधीन. याकरीता शिवप्रेमीकडून ₹ १ रुपया पासून आपल्या इच्छेनुसार थेट जिजाऊ सृष्टीच्या खात्यात आनलाईन शिवदान करण्याची सुविधा.
६,नागपूर येथे भव्य बळीराजा कृषी संशोधन केंद्राची निर्मीती.जेनेकरुन शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधन होवून आत्महत्त्या रोखण्यास मदत होईल.
७,गांव तिथं शाखाद्वारा गावाच्या समस्यांबद्धल लढा देणे.
८,स्पर्धा परिक्षाचे मोफत मार्गदर्शन वर्ग तथा होतकरु विद्यार्थ्यांना आर्थीक मदत.
९,इयत्ता दुसरी ते नववी च्या विद्यार्थांसाठी UPSE & MPSE च्या धर्तीवर RTSE (Rational Talent Search Examination)ही राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षा दर वर्षी डॉ.पं.दे.रा.शि.प.कक्षाद्वारा आयोजित करण्यात येवून पात्र विद्यार्थांना स्कॉलरशिप,तथा गोल्ड सिल्व्हर मेडल ने पुरस्कृत करण्यात येतात.
१०,प्रत्येक कक्षाचे तालुका,जिल्हा,राज्य तथा राष्ट्रीय अधिवेशने,परिषदांचे आयोजन.
११,प्रत्येक जिल्ह्यात जिजाऊ सहकारी पतसंस्था स्थापन.
१२,वधु वर कक्षाच्या माध्यमातून शिवविवाह मेळाव्याचे आयोजन करुन विना खर्ची शेकडो शिवविवाह पार पाडल्या जाते.
१३,महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतीथ्या,बाल संस्कार शिबीरे,व्याख्यानमाला,प्रबोधन शिबीरे,आदी उपक्रमांतून समाजजागृती….इत्यादी अनेक उपक्रम
१४,सुशिक्षित बेरोजगार युवकांना देश विदेशात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन
१५,समाज जागृतीसाठी उत्कृष्ठ कॕडर वक्ते मराठा सेवा संघाच्या चळवळीत तयार झाले.
*विनम्र आव्हान* : सन्माननिय खेडेकर साहेबांनी मोठ्या कष्टानी वाढवलेल्या मराठा सेवा संघ या लोक चळवळीने अनेकांना मोठ केलं आपणही तन मन धनाने चळवळीला अधिक मोठं करुया.
वर्तमान युगातील महान अशा मराठा सेवा संघ सामाजिक चळवळीच्या ३१ व्या वर्धापणदिना ला कोटी कोटी शिवशुभेच्छा.

✒️लेखक:-शझब्दांकन – रामचंद्र सालेकर(मोबा.९५२७१३९८७६)