उपक्रमशील शेतकरी गणेश भोयर यांचा सत्कार

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.1सप्टेंबर):- रंजन सामाजिक संस्था, चंद्रपूर तर्फे चंद्रपूर तालुक्यातील शिवणी चोर येथील गणेश भोयर यांचा डॉ.नंदकिशोर मैंदळकर यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सुदर्शन नैताम, बाळकृष्ण भोयर, सुनील भोयर,मारोती भोयर,राजकुमार सूर,कुणाल पहानपटे,गौरव भोयर,मयूर भोयर,गौरव आक्केवार,सचिन बरबटकर,गंगाधर गुरनुले, नितीन चांदेकर उपस्थित होते.
आजच्या काळात सुशिक्षित युवा वर्ग जेथे नोकरीला प्राधान्य देतो तुटपुंज्या वेतनावर कोणतीही नोकरी करायला तयार असतो.

मात्र अख्ख्या जगाची क्षुधा शमविण्याची क्षमता ज्यात आहे अशा शेती व्यवसायाकडे युवावर्गाने पाठ फिरवली असताना शिवनी चोर येथील गणेश भोयर यांनी शेती सोबतच MA,B.ed,BSC(Agri)पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व शेती व्यवसायाची निवड आपल्या करियर साठी करून यशस्वी दिशेने वाटचाल केली आहे. गणेश भोयर यांनी *सुभाष पाळेकर* यांचे *विषमुक्त शेती* चे निवासी शिबीर पूर्ण केले व मिळवलेल्या ज्ञानाचा अवलंब आपल्या शेतीत करण्याचे ठरविले बीजसंस्कार जीवामृत,घनजीवामृत, कीटक नियंत्रण यांचा आपल्या शेतीत यशस्वी प्रयोग करून दाखविला. *श्रीकांत पोहनकर* यांच्या *मिठातून समृद्धीकडे* या पुस्तकाचे वाचन करून महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून तो प्रयोग आपल्या शेतपिकावर केला.

परिणामी गेल्या वर्षी कापूस पिकामध्ये येणाऱ्या बोंड अळी पासून संरक्षण झाले व चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळाले. तूर पिकामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता चांगले उत्पन्न मिळाले.योग्य अभ्यास पूर्ण माहितीतून प्रमाणबद्ध प्रयोग केल्यास या तंत्रज्ञानाविषयी असलेले गैरसमज निश्चितच दूर होतात.रासायनिक खतांच्या अति वापरामुळे होणारी मृदा व मनुष्यहानी टाळता येते. *”खर्च कमी तर बचत आणि नफा अधिक.”* असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.