वरकुटे म्हसवड येथील तलाठी तिन हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1सप्टेंबर):-वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवर वारसा हक्काने वारसाचे नाव नोंद करून तसा सात बारा उतारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली या तिन हजार रुपये पैकी वारस नोंद करण्यासाठी अॅडव्हान्स म्हणून दाेन हजार रुपयेची लाच स्वीकारताना सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी दादासो अनिल नरळे यास आज (गुरुवार)सापळा रचुन रंगेहात पकडले. वरकुटे- म्हसवड तलाठी कार्यालयात नरळेवर सापळा रचण्यात आला हाेता अशी माहिती एसीबीच्या कार्यालयातून देण्यात आली.

दादासो नरळे हे पाणवण (ता. माण) येथील रहिवासी असुन ते वरकुटे म्हसवड या ठिकाणी असलेल्या वरकुटे तलाठी कार्यालयाच्या सजावर तलाठी म्हणून कार्यरत होते वारसा हक्काची नोंद करण्यास अनेक दिवसापासुन टाळाटाळ करुन नोंद करण्यासाठी पैसाची मांगणी करत होते या विषयी याच्या विराेधात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली हाेती. त्यानूसार त्याची आज सकाळी ११ च्या दरम्यान वरकुटे म्हसवड तलाठी कार्यालयात सदर तक्रारदार व पडताळणीकरणारे अधिकारी कार्यालयात पडताळणी करण्यासाठी तलाठी नरळेवर एसीबीने सापळा रचला.तिन हजाराची डिमांड होती त्या पैकी डिंमांडातील दाेन हजार रुपये घेताना तलाठी दादासो नरळे यास रंगेहाथ या सापळ्यात सापडले.

या सापळयात अवगत अडकण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपधीक्षक अशोक शिर्के, पोलिस नाईक विनोद राजे, कॉन्सेटबल संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले या पथकाने त्याच्यावर कारवाई केली. या पथकास लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शन लाभले.