शाळा, महाविद्यालय, हाॅस्टेल चालू करन्याच्या मागणीचे भारतीय विद्यार्थी मोर्चाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…!

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.2सप्टेंबर):-मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन चे कडक निर्बंध लावण्यात आले त्यामध्ये शाळा, कॉलेज, हाॅस्टेल मागील 18 महिन्यांपासून बंद झाले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी व राज्यातील शाळा महाविध्यालये लवकरात लवकर चालू करण्यात यावेत या मागणीचे निवेदन भारतीय विध्यार्थी मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देणेत आले.

शासनाने ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला परंतु ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना सुविधा अभावी शिक्षण घेता आले नाही परिणामी विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले त्यानंतर राज्य सरकार शाळा सुरू करण्याची केवळ घोषणा करत आहे परंतु अद्याप पर्यंत तारीख निश्चित केली नाही त्यामुळे पालक वर्गामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे.
लाॅकडाउनच्या नावाखाली शाळा,काॅलेज,हाॅस्टेल अशीच जर बंद राहिली तर पुढची पिढी बरबाद होईल.

त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करावी तसेच विद्यार्थ्यांना लसीकरणाची सक्ती करु नये, वस्तीगृह चालू करावी या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी मोर्चा कडुन सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले वरील मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही तर भारतीय विद्यार्थी मोर्चा कडुन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी चेतन आवडे जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा, रोहित नितनवरे,इजाज मुलाणी, प्रथमेश ठोंबरे, किशोर खरात, शुभम भंडारे, इरफान महात, संकेत यादव.इ कार्यकर्ते उपस्थित होते