जुन्या घरगुती वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

35

🔺गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील हादरणारी घटना

✒️नितीन रामटेके(गोंडपिंपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.2सप्टेंबर) :- तालुक्यातील बोरगाव येथे आज दि.२ गुरुवारी भरदिवसा ११ वाजता संघमित्र फुलझले वय अंदाजे ३५ या युवकाने दर्शना झाडे वय ५५ महिलेवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.आरोपी व जखमी महिला शेजारी असून जुन्या घरगुती वादातून हत्या करण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून हाताला आणि कानाला जबर मार लागला आहे.या घटनेने बोरगावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती गावकऱ्यांनी गोंडपीपरि पोलिसांना दिली ठानेदार जीवन राजगुरू आपल्या पोलिस सहकाऱ्यांच्या सोबतीने आरोपीला ताब्यात घेतले असून महिलेवर ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरि येथे उपचार सुरू आहे. हल्ला करण्या मागील कारण अद्याप कडले नसून पोलीस शोध घेत आहे.पुढील तपास पीएसआय मोगरे,प्रफुल कांबळे,शामराव पुलगमकर,एस उईके,पीसी अमित,निलरत्न उराडे,पवार करत आहे.