सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांचेकडून ” आम्ही म्हसवडकर” ग्रुप संचलित कोविड सेंटरला रुग्णवाहिका भेट;आज होणार लोकार्पण सोहळा

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3सप्टेंबर):-गेले पावने दोन वर्षापासुन लोकसहभागातुन लोकवर्गणीच्या माध्यमातुन आम्ही म्हसवडकर ग्रुप नावीन्यपूर्ण व लोक हिताला प्राधान्य देवून लोकांचे जिव वाचवण्यासाठी १०१ लोकांचे” रक्तदान शिबीर” ,”दोन घास सुखाचे “या माध्यमातुन बेवारस, मतीमंद, वेडसर,निराधार व कोव्हीडने उपचार घेणार्या रोज सत्तर लोकांना दोनवेळचे मोफत जेवन सात महिने दिले.

आज वर्षापूर्वी लोकसहभागातुन आम्ही म्हसवडकर ग्रुपने निवासीशाळा येथे कोव्हीड हाॅस्पिटल डीसीएचसी व सीसीसी सेंटर उभारुन एका वर्षात ३ हजार २६५ लोकांचे जिव वाचवले तर या सेंटर मधील आॅक्शीजनच्या १६ ते २२बेडमुळे ९८० लोकांचा जिव वाचवण्यात यश आले असे ४ हजार २४५ लोकांचे जिव वाचवून या सेंटरचा लाभ झाला वर्षाभरात सात ते आठ कोटी रुपयेचा खाजगी दवाखाने, हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी जाणारा खर्च वाचवण्यात आम्ही म्हसवडकर ग्रुपला यश आले लोकसहभागातुन सुरु असलेल्या या सेंटर मधील रुग्णांना गावातुन सेंटर मध्ये आणण्यासाठी मोफत वाहन, दोन हजारात रक्त तपासणी मोफत औषध, मोफत रेमडिसिवीर,देवून हजारोचे जिव वाचवण्याचे काम करणार्या आम्ही म्हसवडकर ग्रुपला पूणे येथील रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन , रोटरी डि ३१३१ यांचे वतीने आणि ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी प्रा. लि. पुणे ( GS Lab ) व फ्रिमेसन ऑफ द लेझ्ली विल्सन लॉज ४८८० E C यांचे आर्थिक सहयोगातून आणि कै श्री विठ्ठल बाबुराव पोरे यांचे स्मरणार्थ श्री वैभव विठ्ठल पोरे यांचे कडून आम्ही म्हसवडकर ग्रुप संचलित कोवीड सेंटर सर्व सोईनियुक्त आधुनिक पद्धतीची ना नफा ना छोटा या तत्वावर अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सचिव कैलास भोरे यांनी सांगीतले
मार्च २०२० मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आम्ही म्हसवडकर ग्रुपने सामाजिक बांधीलकी जपत रक्तदान शिबीराचे आयोजन केले.

या मध्ये १०१ लोकांनी रक्तदान केले,१४ एप्रिल २०२० मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून लाॅकडाऊन व बंद मुळे सर्व हाॅटेल, ढाबे खनावळी दुकानासह सर्व व्यवसाय बंद होते हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व नातेवाईक यांची व बेवारस, मतीमंद, वेडसर,निराधार व कोव्हीडने उपचार घेणार्या रुग्णांची उपास मार सुरु होती त्यांना रोज सत्तर जेवनाचे दोनवेळचे डबे मोफत जयंतीनिमीत्त देण्याचा श्री गणेशा केला सात महिने वहां मोठ्यांच्या वाढदिवसा निमित्त ,लग्णाचे वाढदिवस ,पूण्यस्मरण, आदी कारणाने लोक जेवन देत म्हसवडसह महाराष्ट्र व राज्याबाहेरुन नव्हे परदेशातुन या लोकचळवळीला जेवन देण्यासाठी पैसे रुपी मदतीचा जरा वाहत होता सात महिण्यात ६ हजार ७९० जेवनाचे मोफत डबे देवून दोन घास सुखाचे या उपक्रमातुन उपासमार थांबवून लाखोचे जिव वाचवले.

या कालावधीत करोना वायरसने जगात थैमान घातले होते लोक एकमेकांच्या घरात जात जायाचे सोडा सख्खा भाऊ भावाला बोलत नव्हता नात्यातील माणुस मृत्यु झाल्यावर अग्णी देण्यास मुलगा ही जात नव्हता ऐवढी दहशत या महामारीने लोकांच्या मनाते घर करुन गेली होती अशा परिस्थीतीत आम्ही म्हसवडकर ग्रुपने स्वताची वा घरातील लोकांची काळजी घेऊन पाॅजिटिव झालेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळावा व त्याचा जिव वाचावा यासाठी कोव्हीड सेंटर उभारण्यासाठी म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रस्ता रोको आंदोलन केले त्याला यश मिळताच शासकीय सी सी सी सेंटर प्रथम सुरु केले त्यानंतर ५० रुपये पासुन दिड लाखा पर्यात रोख रक्कम , दोन लाखा पर्यात औषधे रुग्णालयाला लागणारी सर्व साधने लोकमदतीतुन उभारली म्हसवडचे रहिवासी व पूणे येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांनी १६ बेड भेट दिले सप्टेब २०२० पासुन १६ बेड असलेले आॅक्शीजनची डीसीएचसी उभारुन आॅक्शीजन न मिळाल्याने व बेड न मिळाल्याने तडफडून लोक जिव सोडत होते.

लोकसहभागातून हे सेंटर सुरु करुन मृत्यु दर रोखण्यात यश आले या कोव्हीड मुळे म्हसवड मधील चांगली चांगली तरुण मुलासह अनेकांना आपले जिव गमवावे लागले आज आखेर १०१ लोकांचा मृत्यु म्हसवड मध्ये झाला तर साडेचार हजार लोकांचे जिव वाचवून दहा कोटी रुपये या आजारात उपचारासाठी जाणारे वाचवण्यात यश आले आम्ही म्हसवडकरच्या या कामाचा गवगवा सर्वदूर गेल्याने पूणे येथील म्हसवड येथील रहिवासी व पूणे येथील सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात पदोपदी सर्वाना मदतीचा हात देणारे वैभव पोरे यांनी म्हसवड येथील त्यांच्या जन्मगावी सिध्दनाथ हायस्कुलला ८० लाख,मराठी शाळेला १० लाख, शालेय विद्यार्थी यांना दिड कोटीचे किट ,५० लोकांचे डोळ्याचे शिबीर ,पानवन आश्रमास मदत, दर वर्षी दहा हजार रुपये शालेय फि, सिध्दनाथ हायस्कुल, ज्ञानवर्धीनी, सरस्वती, विरकरवाडी धुळदेव ढोकमोडा खडकी मासाळवाडी आदी सारा शाळांना ईलर्निग प्रोजेक्ट चे दोन सेट भेट देवून सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम करुन आम्ही म्हसवडकर कोव्हीड हाॅस्पिटल यांना गंभिर रुग्णांना अधिक उपचारासाठी अॅम्बुलन्सची गरज होती हे ओळखून वैभवजी पोरे यांच्या माधमातुन पूणे येथील रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन , रोटरी डि ३१३१ यांचे वतीने आणि ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी प्रा. लि. पुणे ( GS Lab ) व फ्रिमेसन ऑफ द लेझ्ली विल्सन लॉज ४८८० E C यांचे आर्थिक सहयोगातून आणि कै श्री विठ्ठल बाबुराव पोरे यांचे स्मरणार्थ श्री वैभव विठ्ठल पोरे यांचे कडून आम्ही म्हसवडकर ग्रुप संचलित कोवीड सेंटर ( DCHC ) यांस अत्याधुनिक सर्व सोयींनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका म्हसवड व परिसरातील रुग्णांचे सेवेसाठी अर्पण करणेत येत आहे .

सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुकवार दि ३ सप्टें २०२१ रोजी म्हसवड , ता माण , जि सातारा येथे संपन्न होत आहे .या कार्यक्रमास सर्व म्हसवडकर नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे आवहान अध्यक्ष युवराज सुर्यवंशी व सचिव कैलास भोरे यांनी सांगीतले