केंद्र सरकारच्या ई श्रम कार्ड योजनेस सलून व्यवसायातून उस्फुर्त प्रतिसाद

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.3सप्टेंबर):-राज्यातील सलून कामगार संघटीत नसल्याने आणि या कामगारांची सरकार दरबारी कसलीच नोंद नसल्याने आजवर सर्वच शासकीय योजनांपासून सलून व्यवसायिक वंचित राहिला आहे,परंतु केंद्र सरकारच्या ई श्रम कार्ड या योजनेत सलून कामगारांचाही समावेश झाल्याने आता या सर्व कामगारांची एकाच पोर्टलवर असंघटीत कामगार म्हणून नोंद होणार असल्याने सलून क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे,असंघटीत कामगार म्हणून नोंद झाल्याने भविष्यात सर्व शासकीय योजनांचा आणि सुविधांचा लाभ सलून कामगारांनाही मिळणार आहे.अशाप्रकारे ही ई श्रम कार्ड योजना सलून व्यवसायाला एकप्रकारे पर्वणीच ठरणार आहे.

समाजातील विविध संघटनांनी या योजनेचे महत्व अतिशय छान रित्या समजाऊन सांगितल्यामुळे ई श्रम कार्डाची नोंदणी करण्यास सलून व्यवसायिकांत उस्फुर्त प्रतिसाद पहावयास मिळत आहे,ग्रामीण भागातील कामगार देखील श्रम कार्ड नोंदणी करताना दिसत आहे इतर राज्यांमधील सलून व्यवसायिक देखील श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी पुढे येत आहेत,सलून व्यवसायिकांच्या सोयीसाठी मोफत कार्ड नोंदणी सेंटर सुरू करण्यात आले आहेत

आपल्या राज्यात देखील समाजातील कार्यकर्ते सलून कारागिरांना विना मोबदला कार्ड नोंदणी करून देत आहेत,
अशा प्रकारे राज्यभर कार्ड नोंदणीस उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,कार्ड नोंदणी १०० टक्के यशस्वी करण्यासाठी राज्यातील विविध संघटनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या विभागातील सलून व्यवसायिकांना हे ई श्रम कार्ड काढण्यास प्रोत्साहित करावे आणि तळागाळातील बांधवाला या योजनेत समाविष्ट करून ही ई श्रम कार्ड नाव नोंदणी योजना १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष श्री संजय पंडित यांनी केले आहे.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

One thought on “केंद्र सरकारच्या ई श्रम कार्ड योजनेस सलून व्यवसायातून उस्फुर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED