स्टोरीमिरर धुळे जिल्हा प्रमुख पदी आलीयागोहर जाकीर शेख

32

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.3सप्टेंबर):-भारतात सुप्रसिद्ध साहित्य व्यासपीठ म्हणून स्टोरीमिरर कडे पहिल्या जाते, स्टोरी मिरर ने देशात विविध भाषावर साहित्य सेवा करण्यासाठी नेहमी महत्वाची भूमिका निभावलेली आहे, त्यातच महाराष्ट्र राज्यात स्टोरी मिरर माय मराठी साठी प्रेत्येक महिन्याला नवीन साहित्य स्पर्धा उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत आहे.अगदी तळागाळातील लेखक काला या मोफत मुक्त व खुल्या व्यासपीठाचा फायदा घेता यावा या हेतूने स्टोरी मिरर साहित्यिकांची जिल्हा प्रमुख पदी निवड करत आहे.

धुळे जिल्यातील शिक्षिका तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, आलीयागोहर जाकीर शेख यांची स्टोरी साहित्य ऑनलाईन व्यासपीठाच्या धुळे जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे,त्यांना साहित्य क्षेत्राची आवड असून साहित्य व शिक्षण क्षेत्रातिल उत्कृष्ट कामगिरी पाहून प्रमुख पदाची जबादारी सोपवली आहे, त्यांच्या अनेक कविता चारोळ्या स्टोरीमिरर तसेच इतर माध्यमातून प्रकाशित झालेल्या आहेत,या निवडी बद्दल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे.

धुळे जिल्हा प्रमुख पदी स्वप्न होतील हो साकार साहित्यात नावाजलेले स्टोरीमिररचे आभार आधुनिक युगातील स्टोरीमिरर या नावाजलेल्या साहित्य क्षेत्रात धुळे जिल्हाच्या प्रमुख पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा.रोशन मस्के सर व मा.अंगद दराडे सर यांचे प्रथमतः खूप खूप आभार श्रावण मासात निसर्ग जसा हिरवळीने नटतो नवीन चकाकी येते त्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात राहून नक्कीच माझ्या साहित्य क्षेत्रातील कारकिर्दीला नवीन दिशा मिळेल आणि याचा उपयोग वाचकांपर्यंत पोहचविण्याचा तसेच नवीन साहित्यकांना योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करेन.

या कामगिरीसाठी मला पात्र समजून विश्वास दाखविल्यामुळे आपले व स्टोरीमिररच्या पूर्ण टीमचे पुनश्च आभार.असे आलीयागोहर जाकीर शेख, धुळे यांनी आभार व्यक्त केले आहेत, त्याच्या या निवडी बद्दल अनेकांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.