राष्ट्र सेवा दलच्या वतीने येवला येथे सविधान जागर

32

✒️संदीप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.4सप्टेंबर):- संविधान जागराचा काल ९ वा शुक्रवार होता. अजहरभाई शहा, दिनकर दाणे, अॅड.साजीद शेख, रमेश पवार आणि सुखदेव आहेर या पाचही सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी फारच अभ्यासपूर्ण आणि वास्तवाचा वेध घेणारी मांडणी केली.चर्चेच्या ओघात आज सर्वजण समान नागरी कायद्यापर्यंत पोहचले. त्यावेळी काहीशी गरमागरमीही झाली, मग ठरले की,पुढील शुक्रवारी सर्वांनी समान नागरी कायद्याच्या संबंधाने अभ्यास करुन यावं, या विषयावर गटचर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय संविधानातील मूल्ये समाजात रुजविण्यासाठी या अशा प्रबोधनपर कार्यक्रमात सातत्य तर हवेच,परंतु त्याचबरोबर हेही विसरुन चालणार नाही की, हे काम आपल्यालाच करायचे आहे. यानिमित्ताने सर्वांचाच संविधाना बरोबरच करंट विषयांचा जो अभ्यास होतो तोही अत्यंत आवश्यकतेचा आहे, गेल्या काही दिवसांपासून सेवा दलाची अभ्यास मंडळे बंद झाली आहेत, बंद झालेल्या अभ्यासमंडळांना देखील अतिशय चांगला आणि वैचारिक पायाभरणीसाठी मिळालेला सक्षम पर्यायच सापडला आहे हा.

त्यात सुमारे दोन वर्षांपासून तर कोरोनामुळे संवादाच नाहीय, कार्यकर्त्यांची वैचारिक भूकही वाढत चालली आहे, म्हणूनच दर शुक्रवारी सायंकाळी संविधान मैदानात येण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असतात.इकरा अझहरभाई शहा या १२ वर्षीय मुलीने अत्यंत शुद्ध मराठीत प्रास्ताविका वाचून आम्हा सर्वांना पाठीमागे म्हणायलाही सांगीतले. त्या प्रसंगी राष्ट्र सेवा दलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. अर्जुन कोकाटे सर, दाणे सर, आहेर सर, आजहार भाई शहा, विनोद सोनवणे सर, सातळकर सर आदि कार्यकर्तेही उपस्तित होते.