पैनगंगा कोळसा खदानी विरुद्ध रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा :-प्रहार जनशक्ती पक्ष

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):-पैनगंगा कोळसा खदान गाडेगाव विरुर यांच्याकडे दत्तक असलेले बोरगाव येथील एकाही व्यक्तीला आजपर्यंत पैनगंगा खदान मध्ये कामावर घेतले गेले नाही.पैनगंगा खदानचे श्री.रेड्डी यांना भेटुन प्रहार च्या कार्यकर्तेनी चर्चा केली व 15 तारखेपर्यंत जर बोरगाव येथील रहिवाशी युवकांना कामावर घेतले नाही.

तर पैनगंगा कोळसा खदानी विरुद्ध रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशार प्रहार जनशक्ती पक्षाचे महेशभाऊ हजारे यांनी लेखीनिवेदनाद्वारे दिला आहे.

सोबत कोरपनाचे सक्रीय प्रहारसेवक अफरोजभाई अली, वणीचे सक्रीय प्रहारसेवक नितीनभाऊ गोरे, मारोतीभाऊ राजुरकर,अरुन नवले ,मारोती घोरुडे, प्रथम बुच्चे,अजय लिंगमे, सुरज कोल्हेकर, गजानन चौधरी, शुभम पताडे, प्रशांत बुच्चे,वैभव नवले,महेश गोहोकर, सुनिल तलांडे,रुपेश बुच्चे ईत्यादी ऊपस्थीत होते…