हिंगोणे बु. येथे अंजनी ग्रुप विद्या मंदिरात शिक्षक दिन साजरा

39

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

हिंगोणे(धरणगांव)(दि.6सप्टेंबर):-हिंगोणे बु. येथील अंजनी ग्रुप दुय्यम विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी गावातील सरपंच व शाळेचे अध्यक्ष गणसिंग गोबा पाटील व आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच, सर्व शिक्षकांना पुष्प व शिक्षकांबद्दल संदेश लिहिलेले शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले.तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली.शिक्षक गौरव सप्ताहानिमित्त शाळेच्या वतीने काव्य गायन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्र रेखाटन स्पर्धा घेण्यात आले.

कार्यक्रमात शिक्षक भगीरथ माळी यांचा महत्त्वाचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे अध्यक्ष गणसिंग पाटील, मुख्याध्यापक बी एन पाटील, पर्यवेक्षक डी के पाटील, माजी शिक्षक भगवान गुरुजी व आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.