वै.ह.भ.प.दशरथ जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंदुरीकर महाराज यांचे जाहीर हरीकिर्तन !

✒️आष्टी​ प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6सप्टेंबर):-पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ. जगताप,टाकळसिंगचे माजी सरपंच रामदास जगताप आणि अर्जुन जगताप यांचे वडील वै.ह.भ.प.दशरथ आनाजी जगताप यांचे दि.७ सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यतिथीनिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सकाळी १० ते १२ या वेळात जाहिर हरिकीर्तन होणार आहे.त्या आगोदर मंगळवार दि.७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते १० या वेळात टोकिओ आँलम्पिक खेळाडु अविनाश साबळे आँलम्पिक स्पर्धा २०२१ टोकिया-जपान स्टीपलचेस स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल जाहीर सत्कार,दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत २०० मिटर धावणे या क्रिडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल विकास नवनाथ सायंबर यांचा सत्कार तसेच दहावी बोर्ड परीक्षेत नाविण्यपुर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार आणि एनएमएमएस शालेय स्पर्धा परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे.

आष्टी तालुक्यातील टाकळशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील द्वारका निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.समाजप्रबोधकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर हरीकिर्तनानंतर महाप्रसाद आयोजीत केला असुन जाहीर हरी किर्तनाचा लाभ घ्यावा अशी विनंती सभापती बद्रीनाथ जगताप आणि टाकळसिंग ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED