मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केला बैलपोळा सण उत्साहात साजरा

33

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6सप्टेंबर):- तालुक्यात तीन दिवसापूर्वी चांगला पाऊस झाल्याने सर्व तलाव,नदी,नाले तुडुंब भरले असल्याने यावर्षी पोळा सणाचा आनंद द्विगुणित झाल्याने संपूर्ण आष्टी तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.आष्टी,पाटोदा,शिरुर विधानसभा मतदार संघाचे मा.आ.भीमसेन धोंडे यांनीही प्रतिवर्षीप्रमाणे बैलपोळा उत्साहात साजरा केला.शेतकरी वर्गाचा सर्वात मोठा सण म्हणजे बैलपोळा.दरवर्षी पोळ्याच्या आगोदर पंधरा दिवस हा सण साजरा करण्यासाठी बळीराजाने मोठी तयारी केली होती.मानाने आपला सर्जा राजा गावभर मिरला पाहिजे अशी त्याची भावना असते.

त्यासाठी किमती साज शृंगार त्यामध्ये घुंगरमाळ,तोडे,झुली,गोंडे,असा साज खरेदी केला जातो.पोळ्याच्या आदल्या दिवशी तुपाने खांदा मळणी केली.आज पोळ्याच्या दिवशी बैलाचा मालक दिवसभर बैलाच्या नावाने उपवास करत दिवसभर उपाशी राहतो.तसेच सकाळी सकाळी नदीवर,ओढ्यावर बैलांना अंघोळ घालून या दिवशी कोणतेही काम बैलांकडून करून घेतले जात नाही.अगदी दिवसभर बैलांना सजवण्यात बळीराजा दंग होता.दुपारच्या सुमारास बैलांचा साजश्रुंगार करत गावभर वाजत गाजत मिरवणूक काढली.मा.आ.धोंडे यांनी आपल्या निवासस्थानी बैलांचे पूजन करुन त्यांना गोड पोळी खाऊ सपत्निक पूचाअर्चा केली.यावेळी अजयदादा धोंडे व अभयराजे धोंडे उपस्थित होते.