घाटनांदुर येथे डेंग्यू च्या रूग्णांची वाढ

27

✒️राहुल कासारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.7सप्टेंबर):- अंबाजोगाई तालुक्यात साथीच्या रोगाने थैमान घातले असुन, डेंग्यू, मलेरिया थंडी ताप, अशा अनेक साथीने रूग्णांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील घाटनांदुर गावातील ही डेंग्यू च्या वाढत्या साथीने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दीवसेंदीवस डेंग्यू च्या रूग्णांची वाढ होत असून मागील पंधरा दीवसात चार जणांना लागन झाली आहे. सर्दी, ताप, थंडी याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेबद्दल उदासीन असल्याने, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची सफाई गेले अनेक वर्षे पासून झालेली नाही.

यामुळे अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने सांडपाणी वाहून रस्त्यावर येते व दुर्गंधी सुटते. त्याच बरोबर कचर्‍याची विल्हेवाट लावली जात नाही. अनेक भागात कचर्‍याचे ठीकठीकाणी ठीग लागेल आहेत. यामुळे डासांची उत्पत्ती होते आहे. व यामुळे गावातील रोगराई चे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देवून गावातील तुंबलेल्या नाल्याची सफाई व धुरफवारणी करून घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.