नुकसान झालेल्या ५० मंडळाला तात्काळ सरकारने सरसकट मदत करावी – आ.सुरेश धस

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.10सप्टेंबर):-जिल्ह्यातील ६३ महसूल मंडळांपैकी जवळपास ५० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असतांना आता शासनाने पिकांचे पंचनामे कशाला करायला लावले आहेत.हे कसलेही पंचनामे न करता हे अधिकारी फक्त नदीच्या आणि वड्याच्या कडेला जाऊन हे पंचनामे करत असल्याचा आरोप करत नुकसान झालेल्या ५० मंडळाला तात्काळ मदत सरकारने सरसकट करावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली.
आष्टी येथील अव्दैतचंद्र या निवासस्थानी शुक्रवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.सुरेश धस बोलत होते.

यावेळी उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर,रंगनाथ धोंडे,विनोद रोडे,रावसाहेब देशमुख,भारत मुरकुटे यांच्यासह आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,बीड तालुक्यातील तीन मंडळ,आष्टीतील एक मंडळ,आंबाजोगाई,केज,परळी प्रत्येकी ३ असे एकूण तेरा मंडळ सोडता जिल्ह्यात पाच,सहा,आठ तारखांना सरासरी १३४ एमएम पाऊस आहे आणि बीड तालुक्यातील पिंपळनेर मंडळात तीन दिवस अतिवृष्टी असून,एफडीआरनुसार ६५ टक्के एमएम पेक्षा पाऊस झाला असेल तर जिल्ह्यातील तेरा मंडळ सोडता उर्ववरीत ५० मंडळात अतिवृृृृष्टी झाली आहे.या पन्नास मंडळात जेवढी पेर झाली तेवढी भरपाई देणे गरजेचे असतांना पंचनामे कशाला करायचे आणि पंचनामे करणारे हे फक्त नदीच्या कडेनेच पंचनामे करतात.पाऊस फक्त नदीच्याच कडेला पडतो का? असा सवालही आ.धस यांनी यावेळी उपस्थित केला.एक लाख चौतीस हजार क्युसेस ने माजलगांव धरणातील पाणी सोडावे लागले.आष्टी तालुक्यातील मेहकरी धरण सोडता सर्व तलाव ओहरफ्लो झाले आहेत.
———————————————-
कोकण धरतीवर मदत करावी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणात सरसकट मदत जाहिर केली आणि त्याच धरतीवर बीड जिल्ह्यातील सर्व मंडळांना कसलाही पंचनामा न करता कोकण धरतीवर जिल्ह्यातील शेतक-यांना मदत करावी.अशी मागणीही आ.धस यांनी केली.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED