किन्ही गावात ऐंशी टक्के लसीकरण पूर्ण

🔸सरपंच राहूल काकडे यांनी घरोघरी जाऊन सांगितले लसीचे महत्व

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.10सप्टेंबर):-कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही,परंतु लस घेण्यासही नागरीकांची मानसिकता नसल्याने कोरोनाचा धोका कमी होण्याऐवजी वाढतच जाईल.हिच बाब लक्षात घेऊन आष्टी तालुक्यातील किन्ही गावचे सरपंच राहूल काकडे यांनी गेल्या महिन्याभरात जवळपास तीन चार लसीकरणाचे कॅम्प घेऊन किन्ही ग्रामपंचायतमध्ये ऐंशी टक्के लसीकरण पुर्ण केले आहे.आष्टी तालुक्यातील किन्ही,वेताळवाडी व भवरवाडी या तीन गावची ग्रुपग्रामपंचायत किन्ही असून,या गावात कोरोनाने दोन,तीन जणांचे बळीही घेतले आहेत.

परंतु आता कोरोनाला रोखण्यासाठी स्वतः सरपंच राहूल काकडे यांनीच कंबर खसली असून,महिनाभरात तिन्ही गावात कॅम्प घेत जवळपास ऐशी टक्के नागरीकांचे लसीकरण पुर्ण केले आहे.आज शुक्रवार दि.१० रोजी गणेश स्थापनेच्या दिवसाचे मुहूर्त ठरवत किन्ही येथील प्राथामिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी ९ वाजल्यापासून लसीकरणाला सुरूवात केली.दिवसभरात आज दिडशे लस उपलब्ध झाले होते.पण नागरीकांची लसीकरण करून घेण्याची मानसिकता नसतांना स्वतः सरपंच राहूल काकडे यांनी घरोघरी जाऊन जे नागरिक लसीकरणापासून वंचित राहिलेत त्या सर्वांनचे लसीकरण केले.डॉ.तळेकर एस.एम.,झगडे सर,अँड.एन.एम.शहाणे,आशा वर्कर सुवर्ण जाधव,अंगणवाडी सेविका गुंफावती शिंदे,राधाबाई सोनवणे,श्रीधर काकडे,राम काकडे,भाऊसाहेब काकडे,सुनील वनवे,प्रकाश काकडे,शहाजी भोसले यांच्यासह आदींनी लसीकरण व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED