आ. प्रकाश दादा सोळंके यांच्या सूचनेनुसार भाटवडगाव परिसरातील पंचनामे करण्यात आले

11

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

माजलगाव(दि.12सप्टेंबर):- तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे काल भाटवडगाव परिसरातील पंचनामे तालुक्याचे आमदार. प्रकाश दादा सोळंके यांच्या सूचनेनुसार भाटवडगावचे सरपंच, ग्रामसेवक , तलाठी यांच्याकडून करण्यात आले.तालुक्यात दोन तीन दिवसांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीन, कापूस , मूग, तुर पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

त्यामुळे आमदार. प्रकाश दादा सोळंके यांच्या सूचनेनुसार भाटवडगावचे सरपंच श्रीकृष्ण बप्पा कुटे , तलाठी मडकर साहेब, ग्रामसेवक यादव साहेब , कृषी सहायक भडके साहेब यांनी पंचनामे केले. यावेळी गावातील सरपंच श्रीकृष्ण कुटे यांनी शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आधार दिला. यावेळी गावातील शेतकरी दादाराव अनभूले, विकास काळे , अशोक अनभुले, सोमेश्वर कुटे, अंगद फुके, महादेव कुटे, नंदू अनभुले, शेख जावेद, ग्रा.प. सेवक भागवत सिरसट व गावातील शेतकरी उपस्थित होते.