नेत्याने अतिवृष्टीचे पर्यटन थांबवुन थेट मदत न दिल्यास हातात रुमने घेऊ – शेतकरी विश्वनाथ शिंदे

32

✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नांदेड(दि.12सप्टेंबर):-जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीचे पर्यटन थांबवा आणि सरसकट नुकसान भरपाई द्या नाहीतर आम्ही शेतकरी पुत्र हातात रुमने घेऊन लोकप्रतिनिधींना गाठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मांजरचे शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर यांनी दिला आहे.

नायगाव तालुक्यातील मांजरम भागात 7 सप्टेंबर रोजी ढगफुटी होऊन शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्धवस्त झालेली आहेत शेतकऱ्यांच्या समोर जगावे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे १०० टक्के नुकसान तर झालेच आहे.पाण्याचा प्रवाहाच ऐवढा होता की आमची जनावरे, शेतीची अवजारे,तुषार पाईप वाहुन गेली आहेत तरी देखील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.

पालकमंत्र्यांनी तर फक्त अतिवृष्टीच्या दौऱ्याचे पर्यटन केले आहे.त्यामुळे दौरे थांबवा आणि थेट हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकरी पुत्र आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा दावा मांजरम येथील शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर यांनी केला आहे.