उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका गाडीने जोरदार दिली धडक

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.14सप्टेंबर):-येवल्यात विंचूर चौफुली येथे उभा असलेला टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका कर ने जोरदार धडक दिली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

दरम्यान अधिक माहिती अशी की दि.13 तारखेला रात्री 9 वा गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथील काही प्रवाशी नाशिक येथे राम कुंडावर्ती हस्ती विसर्जीत करण्यासाठी गेले असता परतीच्या प्रवासात ते येवला मध्ये चहा पाणी घेण्यासाठी थांबले. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका गाडीने जोरदार धडक दिली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन एकेरी मार्गाने वाहतूक चालू झाली होती. पोलिसांनी वेळेतच विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. ही सर्व घटना सी सी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली आहे.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED