चामोर्शी :- ग्रामपंचायत मारकंडा (कं) अंतर्गत वार्ड क्रमांक एक मधिल स्ट्रीट लाईन सूरू

🔸पूरोगामी संदेशच्या बातमीचा दणका आलापली मसाहत येथील ग्रामस्थांनी पूरोगामी संदेश वृत्त वाहिनीचे मानले आभार

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.14सप्टेंबर):- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मारकंडा (कं) येथील वार्ड क्रमांक एक आलापली मसाहत येथील स्ट्रीट लाईन एक महिन्या पासून बंद आहे आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणत्याही क्षणी सरपटणारे प्राणी निघू शकतात हे नाकारता येत नाही व आष्टी परीसरात बिबट्या वाघाची दहशत असून हा बिबट्या वाघ मानवी वस्तीत येऊन हल्ले करीत आहे या करीता रात्रोच्या वेळी घराबाहेर पडताना जिव धोक्यात घालून बाहेर पडावे लागते.

करीता स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना माहिती असूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी माहिती पत्रकार भास्कर फरकडे यांना आलापली मसाहत येथील श्री पांडूरंग शेंडे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी यांनी माहिती दिली येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर स्ट्रीट लाईन सूरू करण्यात यावी अशी मागणी आलापली मसाहत येथील ग्रामस्थ करीत आहे.

अशे वृत्त पूरोगामी संदेशच्या माध्यमातून दिनांक 14.9.2021रोजी प्रकाशित करण्यात आले असता स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी महावितरण विभागासी संपर्क साधून आलापली मसाहत येथील स्ट्रीट लाईन सूरू झाल्याची माहिती दिली. श्री पांडूरंग शेंडे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी यांनी पूरोगामी संदेशाचे वृत्त प्रकाशित केल्याने या बातमीचा प्रकाश पडल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष देऊन आलापली मसाहत येथील स्ट्रीट लाईन सूरू केल्याने पूरोगामी संदेश वृत्त वाहिनीचे आभार मानले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED