ग्रामगीता महाविद्यालयातील प्रा.समीर कुमार भेलावे यांच्या पेटंट ला अस्ट्रेलियन सरकारने दिली मान्यता

24

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.15सप्टेंबर):-भौतिक शास्त्रामधील प्रकाश व प्रकाशाचे गुणधर्म यांचे सखोल अध्ययन करून पांढऱ्या प्रकाश्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी केलेल्या संशोधनाला आष्ट्रेलिया सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे.पदार्थ विज्ञान विभागाचे प्रा.समिरकुमार भेलावे व त्यांचे सहकारी यांनी सदर विषयावर अनेक प्रयोग करून देश विदेशातील शास्त्रज्ञांनी मांडलेले सिध्दांताचा अभ्यास करून हे पेटंट तयार केले आहे.

प्रा.भेलावे यांच्या अथक परिश्रमाबद्दल ग्रामगीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी त्यांचा शाल व नारळ देऊन सत्कार सत्कार केला.यावेळी श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव चे प्राचार्य डॉ.बाखरे, सिनेट सदस्य काबरा, डॉ. देशमुख उपस्थित होते.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक संजय बोबले, डॉ. अतुल येरपुडे यांना दिले आहे. डॉ. सुमेध वावरे,प्रा.हुमेश्वर आनंदे,प्रा.डॉ. मृणाल वऱ्हाडे,डॉ. संदीप सातव,प्रा.विवेक माणिक,प्रा.बिजनकुमार शिल,डॉ. निलेश ठवकर,प्रा राजू रामटेके,प्रा.कृष्णा मिसार,आदीने अभिनंदन केले आहे.