सातारा शहरातील वनविभागाचे मुख्य कार्यालयासमोरील अतिक्रमण हटविणेस प्रशासनास सापडेना मुहूर्त

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

सातारा(दि.16सप्टेंबर):- नगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये नव्याने अनेक विभाग समाविष्ट करणेत आले आहेत त्याप्रमाणे सातारा शहरातील गोडोली वनविभाग कार्यालय तसेच रोपवाटिका परिसर हि समाविष्ट आहे अशातच या परिसरातील मुख्य रस्त्या लागत शासनाचे जागेत पत्र्याचे शेड मारून काहींनी अतिक्रमण केले आहे. व या जागेचा निवासी वापर करत आहेत .वनविभागाचे कार्यालयाचे समोर होत असलेल्या या अतिक्रमणाबाबत वनविभाग मात्र हि जागा त्यांचे अखत्यारीत नसलेचे सांगून या अतिक्रमणावर गेली अनेक वर्ष कारवाई करत नाहीत.

संबंधित अतिक्रमणधारक सदर जागा महाराष्ट्र शासनाने आपणास बहाल केली असल्याचे भासवून गेली काही वर्ष राजरोसपणे तिथे वावरून या सरकारी जागेचा वापर वयैक्तिक हितासाठी करत आहे. या जागेचा ते कोणत्या हि प्रकारचा “सरकारी महसूल ” कोणत्याही सरकारी कार्यालयास ते भरत नसलेचे निदर्शनास आले आहे वनविभाग कार्यालय चे आवारात अशी अशी कोणती हि जागा “जिल्हा प्रशासन”अथवा कोणत्या हि सरकारी यंत्रणेने संबंधित अतिक्रमण धारकास दिली नसलेचे उघड झाले आहे.

सदर अतिक्रमित जागे संदर्भात मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सातारा यांचे आदेशानुसार सार्वजनिक बांधकामं उप विभाग सातारा यांनी संबंधितांना गेली ३ वर्षे अनेक वेळा लेखी नोटिसा देऊन शासकीय जागेत बेकायदा अतिक्रमण केलेने व या जागेची मालकी दर्शविणारे कोणतेही कागदपत्र संबंधितांकडे नसलेने ते अतिक्रमण काढून घेणेचे संबंधितास कळविले आहे. परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे नोटीस ला कोणत्या हि प्रकार ची दाद देत नसलेचे स्पष्ट झाले आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त नोटीस सारखी जुजबी कार्यवाही न करता इतर प्रशासकीय विभागांची मदत घेऊन तात्काळ या प्रकरणी शासन निर्णय नुसार ठोस भूमिका घेणे गरजेचे असलेचे बोलले जात आहे.