सोनेगाव येथील तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षपदी नवनाथ दिघोरे यांची निवड

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17सप्टेंबर):-तालुक्यातील सोनेगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा १६ सप्टेंबर रोजी गुरुवारी सोनेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमानंद बक्षीजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत भवनासमोरील पटांगणात पार पडली.यावेळी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षाची निवड करायची होती. यामध्ये गावातील तीन जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने सदर पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

निवडणुकीत गावातील ३ जण रिंगणात उभे होते. यामध्ये नवनाथ शामराव दिघोरे यांना सर्वाधिक १३१ मते मिळाली. त्यामुळे त्यांची तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सदस्यपदी टेकेश्वर लोखंडे, प्रशांत वंजारी, चक्रधर अवसरे यांसह अन्य इतर सदस्यांची निवड करण्यात आली.
यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.