कोमल शेंडे यांची कटक ला होणार्‍या सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी (दि.17 सप्टेंबर):-सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने ओडीसा राज्य संघटनेच्या सहकार्याने बारबाटी स्टेडियम, कटक, ओडीसा येथे दिनांक १९ ते २३ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणार्‍या ३३ व्या राष्ट्रीय सबज्युनिअर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी ब्रह्मपुरी च्या कोमल पंढरी शेंडे यांना नियुक्ती पत्र मिळालेले आहे.

ने. ही. महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथून बीएस्सी बिपीएड पुर्ण केलेल्या कोमलने २०१५ पासुन राष्ट्रीय पंच परिक्षा उत्तीर्ण केलेले कोमल शेंडे यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून कार्य केलेले आहे. ‘कोमल स्टेशनरी’ चा संचालक म्हणून वैयक्तिक व्यवसाय करीत असतांनाही त्यांनी चंद्रपूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन चा कार्यभार उत्तम रित्या सांभाळलेला आहे.

चंद्रपूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे पदाधिकारी डॉ. शेकोकर, महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ. श्री प्रदिप तळवेलकर, चंद्रपूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हा सचिव श्री सुधिर फटींग तसेच महाराष्ट्राचे सॉफ्टबॉल चे मुख्यपंच व राष्ट्रीय पंच समन्वयक श्री मुकुल देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

कोमल च्या कार्यात त्यांना त्यांच्या घरचे कुटुंबिय, श्री शेषराज खेडकर, यांचे सह श्री मिथुन चौधरी, श्री शुभम वसाके यांचे मोलाचे सहकार्य असते.कोमल यांच्या रुपाने आपल्या स्वतःच्या मेहनतीने चंद्रपूर परीसरातील गाव खेड्यांतील अवल खेळाडू सुद्धा मोठे यश मिळवून आपले ध्येय गाठू शकतो याची प्रेरणा घेऊन कार्य करता येईल.